Sanjivani Jadhav, Gaurav Bhosale, Sakal
क्रीडा

आशियाई व दक्षिण आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनाही संधी

सकाळ वृत्तसेवा

Asian and South Asian Cross Country Championships: आगामी आशियाई व दक्षिण आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने भारतीय संघाची घोषणा केली असून त्यात महाराष्ट्राच्या अरुण राठोड, संजीवनी जाधव, गौरव भोसले व प्राची देवकर यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे पुणे एएसआय येथे सराव करणाऱ्या गुलवीर सिंगलाही स्थान देण्यात आले आहे.

आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धा येत्या २० ऑक्टोबर रोजी हाँगकाँग येथे होत असून दक्षिण आशियाई स्पर्धा २४ नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे होत आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत १० हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक विजेता असलेला व युनूस खान यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या गुलवीर सिंगने नुकताच जपान येथे झालेल्या वर्ल्ड कॉन्टीनेंटल स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढताना १३ मिनिटे ११.८२ सेकंदाचा नवीन विक्रम केला होता.

सोलापूर येथील सुशील कुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या अरुण राठोडची निवड करण्यात आली आहे. महिला संघात नाशिकच्या आंतरराष्ट्रीय संजीवनी जाधवचा समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी पुरुष व महिला संघासोबत २० वर्षांखालील मुला-मुलींचा संघही जाहीर करण्यात आला आहे, मात्र या स्पर्धेतील सहभाग खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, असे महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी स्पष्ट केले.

निर्धारित कार्यक्रमानुसार ही स्पर्धा मार्च महिन्यात होणार होती. दक्षिण आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी पुण्‍याच्या गौरव भोसलेची मुलांच्या संघात निवड करण्यात आली असून तो मध्य रेल्वेत कार्यरत असलेले शिवछत्रपती पुरस्कार विजेते ॲथलिट भास्कर भोसले यांचा मुलगा होय.

मुलींच्या संघात बंगळूर येथे नॅशनल एक्सलन्स सेंटर येथे सराव करणाऱ्‍या सातारा जिल्ह्यातील किरपे गावच्या प्राची देवकरची निवड करण्यात आली आहे. तिने नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.

संजीवनीकडून अपेक्षा

नाशिकच्या संजीवनी जाधवकडून आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत पदकाची अपेक्षा आहे. पॅरिस ऑलिंपिकपूर्वी अमेरिकेत सरावाला असलेल्या संजीवनीने २०१८ साली चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते.

तसेच गेल्यावर्षी काठमांडू येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाला सांघिक सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्यामुळेच तिच्याकडून अपेक्षा करण्यात येत आहे. दक्षिण आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत तर तिन्ही पदकांसाठी भारतीय स्पर्धकांत चुरस राहील, यात शंका नाही.

भारतीय संघ

  • पुरुष: गुलवीर सिंग, कार्तिक कुमार, अभिषेक पाल, अरुण राठोड (सोलापूर).

  • महिला : अंकिता, सीमा, संजीवनी जाधव, सोनिका.

  • ज्युनिअर मुले : अमरदीप पाल, कृपाशंकर यादव, विनोद सिंग, गौरव भोसले.

  • ज्युनिअर मुली : एकता डे, सुनीता देवी, शिल्पा धिओरा, प्राची देवकर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election: ''काय झाडी.. काय डोंगर... किती हे खोके?'' पुण्यात नाकाबंदीदरम्यान सापडले पाच कोटी

Karad Assembly Election 2024 : कऱ्हाडला सोनू, नकटा रावळ्यासह बुक्कीत टेंगुळवरही रंगताहेत चर्चा

Sarfaraz Khan: सर्फराज खानला पुत्ररत्न! गोड बातमी सोशल मीडियात व्हायरल

Australia दौऱ्यासाठी भारत A संघाची घोषणा, ऋतुराजच्या हाती कर्णधारपदाची धुरा, इर्श्वरनला दिली मोठी संधी

Melie Kerr: लहानपणी ज्यांच्याबरोबर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न होतं, ज्यावर निबंध लिहिला.... जेव्हा अगदी तसंच घडतं

SCROLL FOR NEXT