World Table Tennis Championship sakal
क्रीडा

World Table Tennis Championship : भारताचे दोन्ही संघ विजयासह बाद फेरीत ; मनिकाचे संमिश्र यश

भारताच्या दोन्ही संघांनी (पुरुष व महिला) जागतिक टेबलटेनिस सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत विजय साकारला.

सकाळ वृत्तसेवा

बुसान (दक्षिण कोरिया) : भारताच्या दोन्ही संघांनी (पुरुष व महिला) जागतिक टेबलटेनिस सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत विजय साकारला. भारताच्या पुरुष संघाने न्यूझीलंड संघावर ३-० असा सहज विजय नोंदवला, तर भारताच्या महिला संघाने स्पेनचे कडवे आव्हान ३-२ असे परतवून लावले. भारताच्या दोन्ही संघांनी विजयासह बाद फेरीत प्रवेश केला.

भारत-स्पेन यांच्यामध्ये गट एकमधील अखेरचा साखळी फेरीचा सामना रंगला. भारतीय संघाला पहिल्या दोन लढतींत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सुरुवातीलाच भारतीय महिला संघाला धक्का बसला. मारिया शिओ हिने श्रीजा अकुला हिच्यावर ११-९, ९-११, १३-११, ११-४ असा विजय साकारला. त्यानंतर अनुभवी मनिका बत्रा हिचाही पराभव झाला. सोफिया झँग हिने मनिकाचा संघर्ष १३-११, ६-११, ८-११, ११-९, ११-७ असा मोडून काढला. दोन पराभवांमुळे भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर गेला.

महिला संघाने शेवटच्या तीन लढतींमध्ये विजय साकारत स्पेनवर ३-२ असे यश मिळवले. अयहिका मुखर्जी हिने एलविरा रॅड हिच्यावर ११-८, ११-१३, ११-८, ९-११, ११-४ असा विजय संपादन केला. मनिका बत्राने परतीच्या लढतीत मारिया शिओ हिचा ११-९, ११-२, ११-४ असा धुव्वा उडवला. अखेरच्या लढतीत श्रीजा अकुला हिने बाजी मारली. तिने सोफिया झँग हिला ११-६, ११-१३, ११-६, ११-३ असे नमवले.

... तर पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश

भारताच्या दोन्ही संघांना या स्पर्धेमधून पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश करता येणार आहे. अंतिम ३२ फेरीची तसेच अंतिम १६ फेरीची लढत जिंकल्यास दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. त्याचसोबत ऑलिंपिकमधील प्रवेश पक्का होईल.

हरमीत, साथियान, मनीषमुळे पुरुषांची सरशी

भारताच्या पुरुष संघाने गट तीनमधील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत न्यूझीलंडवर ३-० असा विजय मिळवला. हरमीत देसाई, जी. साथियान व मनीष शाह यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराभूत करीत दिमाखदार विजय मिळवून दिला.

पुरुष विभाग (गट तीन, ताजा गुणतक्ता)

  • १) कोरिया ४ सामने ४ विजय ८ गुण

  • २) पोलंड ४ सामने ३ विजय ७ गुण

  • ३) भारत ४ सामने २ विजय ६ गुण

  • ४) चिली ४ सामने १ विजय ५ गुण

  • ५) न्यूझीलंड ४ सामने शून्य विजय ४ गुण

  • महिला विभाग (गट एक, ताजा गुणतक्ता)

  • १) चीन ४ सामने ४ विजय ८ गुण

  • २) भारत ४ सामने ३ विजय ७ गुण

  • ३) हंगरी ४ सामने २ विजय ६ गुण

  • ४) स्पेन ४ सामने १ विजय ५ गुण

  • ५) उझ्बेकिस्तान ४ सामने शून्य विजय ४ गुण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT