Paris Olympic Qualifier 2024  Sakal
क्रीडा

Paris Olympic Qualifier 2024 : भारताची महिला तिरंदाज भजन कौरने मिळवला पॅरिस ऑलिंपिक कोटा

भजन कौर हिने अंतिम फेरीच्या लढतीत इराणच्या मोबिना फल्लाह हिच्यावर ६-२ असा विजय संपादन केला.

सकाळ वृत्तसेवा

अंतल्या (तुर्की) ­­: भारताची महिला तिरंदाज भजन कौर हिने रविवारी देदीप्यमान कामगिरी केली. तिने जागतिक पॅरिस ऑलिंपिक पात्रता फेरीतील महिलांच्या रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. याचसोबत तिने भारताला ऑलिंपिक कोटाही मिळवून दिला.

भजन कौर हिने अंतिम फेरीच्या लढतीत इराणच्या मोबिना फल्लाह हिच्यावर ६-२ असा विजय संपादन केला. या विजयासह तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यामुळे भारताला वैयक्तिक प्रकारात कोटा मिळवता आला. याआधी पुरुष विभागात धीरज बी. यानेही ऑलिंपिक कोटा मिळवून दिला होता.

दरम्यान, रिकर्व्ह प्रकारातील सांघिक कामगिरीत भारताचे पुरुष व महिला हे दोन्ही संघ अव्वल क्रमांकावर आहेत. त्यामुळे क्रमवारीनुसार या दोन्ही संघांना कोटा मिळण्याची दाट शक्यता आहे. १८ ते २३ जून दरम्यान होत असलेल्या विश्‍वकरंडकात भारताच्या दोन्ही संघांनी किमान उपांत्यपूर्व फेरी गाठायला हवी. त्यानंतर भारताच्या संघांना ऑलिंपिक कोटा मिळू शकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Polluted Yamuna : यमुनेतील 'डुबकी भोवली'...नदीत आंघोळीनंतर भाजप नेत्याची तब्येत बिघडली; रुग्णालयात केलं दाखल

Elon Musk Wikipedia : आता पुरे झालं! विकिपीडियाला देणग्या देणं बंद करा; असं का म्हणाले इलॉन मस्क,नेमकं प्रकरण काय?

सर्जामधील बॅकलेस सीन शूट करताना घाबरलेली दिग्गज अभिनेत्री ; "दत्ता काकांनी मला अचानक सांगितलं..."

Latest Maharashtra News Updates : भाजप मुंबईत १८ जागा लढवणार

WTC 2025: भारतानं मालिका तर हरलीच, पण Points Table मधील अव्वल नंबरही धोक्यात; न्यूझीलंड आता कोणत्या स्थानी?

SCROLL FOR NEXT