विसाव्या शतकात महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. खेळात देखील अनेक आव्हानांचा सामना करत त्या पुढे येत होत्या. क्रिकेट या खेळाविषयी भारतीयांना खास आकर्षण होतं. मग महिला तरी त्यात मागे कशा राहतील. टिव्हीवर क्रिकेटचे सामने पाहणे आणि त्यातही वर्ल्डकप हा भारतीयांसाठी कोणत्याही उत्सवापेक्षा कमी नव्हता. १९९७ साली वुमेंस वर्ल्ड कपमध्ये ईडन गार्डन मैदानात ऑस्ट्रेलिया -न्यूझिलंड हा अंतिम सामना सुरू होता. तेव्हा बंगालमधील एक मुलगी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहत होती. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण इतकं सोपं नव्हत. मुलींनी मैदानातील आणि त्यातही पुरूषांचे खेळ निवडण्याला समाजातून प्रचंड विरोध होता,अनेक अडथळे होते. मात्र या सर्वांवर मात करत, या मुलीने महीला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू होण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. हो, मी बोलतेय झुलन गोस्वामीबद्दल !
२५ नोव्हेंबर १९८२ ला झुलनचा जन्म पश्चिम बंगालमधील चकदा येथे मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. पश्चिम बंगालच्या नादीया जिल्ह्यातील 'चकदा' या अतिदुर्गम भागातून, क्रिकेट खेळण्यासाठी, 80 कीलोमीटर दूर असलेल्या कोलकत्ता शहरात ती भल्या पहाटे लोकलने जायची. बऱ्याचदा लोकल मिळायची नाही. पण क्रिकेटमध्ये करियर करायचं हे तिने मनाशी पक्क केलं होतं. घरी मात्र तिने अभ्यासात लक्ष घालावं अशी पालकांची ईच्छा होती. शाळा आणि क्रिकेटचं वेड यात तिला समतोल साधावा लागायचा. चमकणारा तारा पाहण सगळ्यांनाच आवडतं. पण हा तारा चमकतो तो सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशामुळ, झुलन गोस्वामी ही ताऱ्याप्रमाणे चमकतेय ती कोच स्वपन साधू यांच्यामुळे.
झुनलचं क्रिकेट खेळण म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष असं तिच्या पालकांना वाटायचं. मात्र झुलनला 'ब्लू जर्सी' पर्यंत पोहोचवण्यात तिचे प्रशिक्षक स्वपन साधू यांचा मोठा वाटा आहे. झुलन दक्षिण कोलकात्यातील 'विवेकानंद पार्कवर' स्वपन साधू यांच्या अॅकॅडमीत खेळायला जायची. उंच असलेल्या झुलनची बॉलिंग चांगली होती. जेव्हा साधू यांना कळालं घरी तिच्या क्रिकेट खेळण्याला पाठींबा नाही. तेव्हा स्वपन साधूंनी अचानक तिच्या घरी भेट दिली, तिच्या पालकांना समजून सांगितलं. अनेक मुलाखतींमध्ये स्वपन साधू यांनी झुलन गोस्वामीबद्दल आठवणी सांगितल्या आहेत. ''खूप लांबच्या छोट्याश्या खेड्यातून झूलन लांबचा प्रवास करून यायची. बऱ्याचदा तिकीटासाठी तिच्याकडे पैसे नसायचे. त्यामुळे अनेक ट्रेनिंग सेशन्सना तिला येता यायचं नाही.'याच झुलनने पुढे भारतीय महीला क्रिकेट संघाचं कर्णधारपद देखील सांभाळलयं.
मुलींनी क्रिकेट खेळायला सुरुवात करणं ते त्यांनी मैदानावर टीम म्हणून उतरणे जरी शक्य झालं तरी महीला क्रिकेटच्या सामन्यांना पाहिजे तसा प्रतिसाद नव्हता. मात्र २०१७ च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय महीला खेळाडूंनी ऑस्ट्रलियाविरूद्ध जिगरबाज खेळ करत अंतिम सामन्यात धडक मारली. वर्ल्डकपमधील फायलनचा सामना संपूर्ण देशाने पाहिला. भारतीय संघाने इग्लंडच्या संघाला चांगलीच झुंज दिली होती. केवळ ९ धावांनी हा सामना भारत हारला. मात्र संपूर्ण देशाने संघाचं कौतुक केलं. त्यानंतर मात्र महिला क्रिकेटला चांगले दिवस आलेत असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. खेळाडू म्हणून मैदानात उतरणं ते श्रोत्यांनीही महीला क्रिकेट पाहणं हा मोठा प्रवास झुलनने पार केलाय.
झुलन गोस्वीमीचा २०१० मध्ये 'अर्जुन' पुरस्काराने तर २०१२ मध्ये पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतीय महिला क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज 'मिताली राज' आणि 'झुलन गोस्वामी' यंदाच्या वर्ल्डकपनंतर आपला झंजावाती क्रिकेट प्रवास थांबवणार आहे. झुलनने गेली दोन दशक वेगवान गोलंदाजीचं डिपार्टमेंट एकहाती सांभाळलं आहे. एका फास्ट बॉलरने एवढी मोठी कारकिर्द घडवणं हे विशेष आहे. आता मेघना सिंहकडून ही अपेक्षा केली जातेय. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामीच्या संघर्षमय जीवनावर आधारीत 'चकदा एक्सप्रेस' ही फिल्म 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणार आहे. यात अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. '
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.