क्रीडा

VIDEO: आखाड्यात 'दंगल'; प्रतिस्पर्ध्याचा भारतीय पैलवानाला चावा

सुस्मिता वडतिले

प्रतिस्पर्धी पैलवानाने अखिलाडूवृत्तीपणाचा कळसच केला. त्याने रवी दाहियाच्या हातावर चावा घेतला.

Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी बुधवार हा विशेष दिवस ठरला. या दिवशी भारताची बॉक्सर लवलिना बोर्गोहेनने ब्रॉन्ज मेडल पटकावले, तर भारतीय कुस्तीचा डार्क हॉर्स रवी कुमार दहिया याने पुरुष फ्रीस्टाईल कुस्तीच्या 57 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली.

रवी दाहियाने कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेवच्या 7-9 ने पिछाडीवर होता. त्यावेळी सनायेवला काही वेदना जाणवल्या. यानंतर त्याने रवीसमोर आत्मसमर्पण(सरेंडर) केले. हा सामना जिंकल्यानंतर रवीने सहजपणे अंतिम फेरी गाठली.

या विजयाच्या दरम्यान, अशी एक गोष्ट समोर आली की, ज्याकडे कुणाचेही लक्ष गेले नव्हते. सामन्याच्या शेवटच्या क्षणी जेव्हा रवी दाहिया नुरिस्लाम सनायेव तुटून पडला होता, तेव्हा प्रतिस्पर्धी पैलवानाने अखिलाडूवृत्तीपणाचा कळसच केला. त्याने रवी दाहियाच्या हातावर चावा घेतला.

ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेतील कुस्ती दरम्यान असे काही घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, त्यापूर्वी 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारने पुरुष फ्रीस्टाईल कुस्तीच्या 66 किलो गटात कझाकिस्तानच्या अखजरेख तनात्रोवला कानावर चावा घेतला होता. यानंतर सुशील अंतिम फेरीत पोहोचला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT