indonesia football match violence esakal
क्रीडा

Indonesia Football Match : इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा हिंसाचार; 127 हून अधिक लोकांचा मृत्यू

हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Indonesia Stampede : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान (Indonesia Football Match) झालेल्या गोंधळ आणि हिंसाचारात 127 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. त्यात दोन पोलिसांचाही समावेश आहे.

अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात झालेल्या या सामन्यात अरेमाचा संघ पराभूत होताच, त्याच्या हताश समर्थकांनी मैदानावर गोंधळ घातला. स्टेडियममधील चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलीस पुढे आले. मात्र, त्यांनाही ते थांबवता आलं नाही. स्टेडियममध्येच डझनभर लोकांचा मृत्यू झाला. उर्वरितांना रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं त्यांचा मृत्यू झाला.

न्यूज एजन्सी एएफपीनं पोलिसांच्या हवाल्यानं सांगितलं की, पूर्व जावा येथील एका स्टेडियममधील सामन्यातील पराभवामुळं निराश झालेल्या प्रेक्षकांनी फुटबॉल खेळपट्टीवरच गोंधळ घातला. या चेंगराचेंगरी आणि हिंसाचारात दोन पोलिसांनाही आपला जीव गमवावा लागला. स्टेडियममध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 127 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

रिपोर्टनुसार, ही घटना पूर्व जावाच्या मलंग भागातील कंजुरुहान स्टेडियममध्ये घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये लोकांनी सीमा ओलांडून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून येतं. स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. स्टेडियममधील गोंधळ काही वेळात थांबला, पण संतप्त लोक रस्त्यावर आले आहेत. हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील व्हा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT