मुंबई: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील (T20I Series) पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज (दि. 26) दुसरा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान, भारतीय संघात एक बदल करण्यात आला. सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) जागी मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले आहे. ऋतुराज गायकवाड मनगटाच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. आता तो संपूर्ण मालिकेला मुकणार आहे.
भारताचा कसोटी संघातील सलामीवीर मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) कसोटी मालिकेसाठी चंदीगड येथे दाखल झाला होता. त्याला आता ऋतुराज गायकवाडच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून धर्मशाळा येथे जाण्यास सांगितले आहे. तो आता शेवटच्या दोन टी 20 सामन्यासाठी भारतीय संघात असेल.
मयांक अग्रवालने आतापर्यंत एकूण 164 टी 20 सामने खेळले असले आणि तो आता पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार झाला असला तरी त्याला भारताकडून टी 20 मध्ये पदार्पण करण्याची संधी अजून मिळालेली नाही. दुसरीकडे भारतीय टी 20 संघात (Indian T20I Cricket Team) ऋतुराज गायकवाडला स्थान मिळून देखील त्याला अंतिम अकराच्या संघात खेळण्याची फारशी संधी मिळालेली नाही. त्याला वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेत एका सामन्यात संधी मिळाली मात्र त्याला फारशी चमक दाखवता आली नाही.
सध्या मर्यादित षटकांच्या भारतीय संघात रोहित शर्मा, इशान किशन, शिखर धवन हे सलामीवीर असल्यामुळे ऋतुराज गायकवाडला संधी मिळेलच याची शाश्वती दिसत नाही. त्यातच तो दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या अडचणीत अजूनच वाढ झाली आहे. दुसरीकडे सातत्याने संधी मिळालेला इशान किशनने अखेर 89 धावांची खेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.