ICC sakal
क्रीडा

International Cricket Council : इंदूर खेळपट्टीवरून ICC चा पक्षपात!

गावसकर यांचे टीकास्त्र; ब्रिस्बेनमध्ये काय घडले दिसले नाही का?

सकाळ वृत्तसेवा

इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूर येथे झालेला तिसरा कसोटी सामना अवघ्या अडीच दिवसांमध्ये संपला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदेने (आयसीसी) इंदूर शहरातील होळकर मैदानावरील खेळपट्टीला सुमार दर्जा दिला आहे. आता आयसीसीच्या याच सुमार दर्जावरून भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी आयसीसीवर टीका करत पक्षपात करत असल्याचे बोल सुनावले.

भारतात आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेल्या इंदूर येथील कसोटी सामना केवळ अडीच दिवसांत संपला. त्यावरून आयआयसीसीने तिथल्या खेळपट्टीला सुमार दर्जाची खेळपट्टी असा शेरा मारला.

मग ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये गेल्या डिसेंबर महिन्यात ब्रिस्बेनमधील गॅबा मैदानावर खेळवण्यात आलेल्या मालिकेतील दुसरी कसोटी अवघ्या दोन दिवसांमध्ये निकाली लागली होती. तेव्हा आयसीसीने या गॅबावरील खेळपट्टीला कुठला दर्जा देऊन डिमेरीट गुण दिले होते? आयसीसीने पक्षपातीपणे इंदूरच्या खेळपट्टीला सुमार दर्जा दिला असल्याचे गावसकर यांनी म्हटले आहे.

इंदूरमधील खेळपट्टीला सुमार दर्जाची खेळपट्टी असा दर्जा देताना सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी खेळपट्टी लढतीच्या पहिल्या दिवसापासूनच फिरकीला साथ देणारी होती. या सामन्यात फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये कुठल्याच प्रकारची स्पर्धा बघायला मिळाली नाही.

खेळपट्टी कोरडी होती. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये समतोल साधला जात नव्हता. सामन्यातील पाचवाच चेंडू वळला होता तसेच विषम प्रमाणात उसळीसुद्धा घेत होता’ असे मत प्रदर्शित केले आहे.

गावसकर उपस्थित करत असलेल्या ब्रिस्बेनमधील खेळपट्टीला आयसीसीने सरासरीपेक्षा कमी दर्जाची खेळपट्टी असा दर्जा दिला होता; तर एक डिमेरीट गुण दिला होता; मात्र इंदूरमधील खेळपट्टीला वेगळा न्याय का? कारण येथील खेळपट्टीला तीन डिमेरीट गुण दिले गेले आहेत, असा प्रश्न उपस्थित करून गावसकर यांनी आयसीसीवर पक्षपातीपणाचा आरोप लावला आहे.

जेव्हा जेव्हा भारतात कसोटी सामने खेळवले जातात, तेव्हा फक्त खेळपट्टीबद्दल बोलले जाते; मात्र परदेशातील खेळपट्ट्यांबद्दल सामना चालू असताना जास्त टिप्पणी होताना दिसत नाही.

- सुनील गावसकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : मराठी माणसांचे दोन पक्ष तोडण्याचे काम भाजपाने केले - जयंत पाटील

SCROLL FOR NEXT