ESports: ऑलिंपिकमध्ये ई- स्पोर्ट्स खेळवण्याचा ऐतिहासिक निर्णय २४ जुलै २०२४ रोजी इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीने एकमताने घेतला आहे. २०२५ मध्ये सौदी अरेबिया येथे या ई- स्पोर्ट्स स्पर्धेचं अनावरण केलं जाणार आहे.
इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी (IOC) ने २०१८ पासूनच ई- स्पोर्ट्स बाबतीत आपली आवड दर्शवलेली होती. खेळाडू आणि क्रीडाप्रेमी यांना सामन्यांमध्ये अद्भुत अनुभव देणे, क्रीडाविश्वाला तंत्रज्ञानाद्वारे अधिक प्रसिद्ध करणे, तसेच आधुनिक पद्धतीकडे वाटचाल करणे हेच कमिटीचं ध्येय आहे. IOC चे अध्यक्ष थॉमस बाख म्हटले की, "हे खऱ्या अर्थाने क्रीडाविश्वातील नवे युग आहे. कमिटीच्या सेशनमध्ये झालेल्या या निर्णयावरून ऑलिंपिकच्या जगात आधुनिक क्रांती निर्माण होईल."
ई- स्पोर्टस म्हणजे काय ?
इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्स म्हणजेच याला संक्षिप्त स्वरुपात ई- स्पोर्टस असे म्हटले जाते. याद्वारे अनेक वैयक्तिक किंवा सांघिक खेळ हे व्हिडीओ गेमच्या माध्यामातून खेळवले जातात. दरवर्षी दशलक्ष प्रेक्षकांना ई- स्पोर्टस आकर्षित करत असल्याची माहिती आहे.
IOC ने काय निर्णय घेतला ?
पॅरिसमध्ये झालेल्या १४२ व्या इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीचे सेशन झाले. त्यामध्ये मध्ये ई- स्पोर्ट्स विषयी सकारात्मक निर्णय घेऊन IOC च्या कार्यकारी मंडळाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
सिंगापूर येथे २०२३ मध्ये एका आठवड्यासाठी ऑलिंपिक ई- स्पोर्ट्स IOC द्वारे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ५७ देशांतील १३० खेळाडूंनी १० वेगवेगळ्या क्रीडास्पर्धेत भाग घेतला होता. तो एक यशस्वी प्रयोग होता असे समजल्यावर कमिटीने ऑलिंपिकमध्ये ई- स्पोर्ट्सबाबत निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी वेगळी स्वतंत्र समिती स्थापन करणार असल्याची माहिती देखील दिलेली आहे.
अद्यापतरी कोण-कोणते खेळ ई- स्पोर्टस मध्ये खेळवले जातील याची यादी जाहीर केलेली नाही. पण २०२३ मध्ये सिंगापूरमध्ये हे खेळ घेण्यात आले होते,
धनुर्विद्या
बेसबॉल
बुद्धिबळ
नृत्य
मोटार स्पोर्ट्स
नौकानयन
नेमबाजी
तायक्वांदो
टेनिस
यांमधील काही खेळ ज्यांची कल्पना आपण कधीच ई- स्पोर्टसमध्ये केलेली नाही आता त्या खेळामध्ये आधुनिकता आणली जाणार आहे. तायक्वांदो सारखा खेळ, ज्यामध्ये आभासिक वास्तविकता, मोशन कॅप्चर तसेच बॉडी ट्रॅकिंग यांसारख्या विकसीत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
भविष्य काय असेल ?
ई- स्पोर्ट्स हा झपाट्याने वाढत चाललेला उद्योग आहे. योग्य उपयोग करून पारंपारिक खेळांच्या पद्धतीला आता जागतिक स्तरावर आधुनिक पद्धतीची झळ देऊन क्रीडाविश्वामध्ये प्रगती करणे हा मुख्य उद्देश आहे.
प्रत्येक क्रीडा संघटनेला ई- स्पोर्ट्सच्या विश्वामध्ये व्यावसायिक संधी देखील उपलब्ध होण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.