T20 in Olympics  Esakal
क्रीडा

ठरलं! आता ऑलिम्पिकमध्ये रंगणार T20 क्रिकेटचा थरार; IOCचं शिक्कामोर्तब

या प्रस्तावावर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (IOC) यावर सोमवारी मतदान केलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : क्रिकेटवेड्या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. कारण आता ऑलिम्पिकमध्ये T20 क्रिकेटचा थरार पहायला मिळणार आहे. यावर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (IOC) यावर सोमवारी मतदान केलं. यानंतर अधिकृतरित्या क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होणार आहे. (IOC approves Cricket for Olympics will be included from 2028 Los Angeles Olympics)

भारतासाठी महत्वाचं

भारतासाठी हा महत्वाचा भाग ठरणार आहे. कारण सध्या सुरु असलेला आयसीसीचा क्रिकेट वर्ल्डकपचं भारतानं आयोजन केलं आहे. त्याचबरोबर मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये नुकतंच १४१ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीच्या सेशनंच आयोजन केलं होतं, तब्बल ४० वर्षानंतर भारतात हे पार पडलं. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी या सेशनचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी दावा केला होता की, २०३६ च्या ऑलिम्पिकचं यशस्वी आयोजन करण्यासाठी भारत कोणतीही कस सोडणार नाही.

चार खेळांचा होणार ऑलिम्पिकमध्ये समावेश

IOC च्या कार्यकारी बोर्डानं गेल्या आठवड्यात लॉस एन्जेलिसच्या ऑलिम्पिकसाठी ज्या खेळांचा समावेश करायचा आहे, त्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यामध्ये पुरुष आणि महिलांच्या क्रिकेटच्या T20 फॉरमॅटशिवाय इतर चार खेळाचा समावेश आहे.

बेसबॉल-सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉझ (सिक्सेस) आणि स्क्वॅश हे ते खेळ आहेत. यावर आज सोमवारी मतदान घेतलं जाणार होतं. (Marathi Tajya Batmya)

क्रिकेट T20ची लोकप्रियता वाढतेय

IOCचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं की, क्रिकेटसह इतर चार खेळांचा समावेश हा केवळ २०२८ च्या लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकमध्ये होणार आहे. ही बाब अमेरिकन क्रीडा संस्कृतीशी सुसंगत आहे आणि अमेरिकेतील तसेच जागतिक स्तरावरील नवीन खेळाडूंना आणि चाहत्यांना ऑलिम्पिक समुदायाशी संलग्न होण्यास मदत होईल.

क्रिकेट T20 ची लोकप्रियता वाढत आहे. ५० षटकांच्या क्रिकेटनं यापूर्वीच मोठं यश मिळवलं आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT