australian cricketer File Photo
क्रीडा

IPL 2021... तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना बसणार 41 कोटींचा फटका

सुशांत जाधव

देशातील कोरोनाजन्य परिस्थितीत सुरु असलेली आयपीएल स्पर्धा (IPL 2021) 4 मे रोजी स्थगित करण्यात आली. आता ही स्पर्धा युएईच्या (IPL In UAE) मैदानात खेळवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. उर्वरित 31 सामने हे सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर आता बीसीसीआयसमोर नवा पेच उभा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज आणि पॅट कमिन्स (Pat Camins) याने युएईत होणाऱ्या स्पर्धेत खेळणार नसल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघातील अन्य खेळाडूही स्पर्धेत खेळण्याबाबत संभ्रम आहे. (ipl 2021 australias top 10 players will lose 41 crore for not playing remaining matches)

जर आयपीएलच्या उर्वरित सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टॉप टेन खेळाडूंनी माघार घेतली तर बीसीसीआयला जवळपास 41 कोटींचा तोटा सहन करावा लागू शकतो. या सर्व खेळाडूंनी अर्धे सामने खेळले असून नियमानुसार, त्यांनी करारानुसार निम्मे मानधन द्यावे लागणार आहे. पॅट कमिन्स हा आयपीएलमधील महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. केकेआर फ्रेंचायझीने त्याच्यासाठी 15.50 कोटो मोजले आहेत. उर्वरित सामन्यात तो खेळला नाही तर त्याला 7.75 कोटी रुपये मिळणार नाहीत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघातील ग्लेन मॅक्सवेलसाठीही मोठी रक्कम मोजण्यात आली होती. 14.25 कोटीत बंगळुरुने त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. तो जर उर्वरित सामन्यात खेळला नाही तर त्याला 7 कोटींचे नुकसान होईल. झाय रिचर्डसनलाही 14 कोटीपैकी 7 कोटीच मिळतील. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळलेल्या नॅथन कुल्टर नाइल याला 5 कोटीपैकी 2.5 कोटीवरच समाधान मानावे लागेल. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसलेल्या मार्कस स्टॉयनिसला 2.4 कोटींचा तोटा सहन करावा लागेल.

युएई बोर्डाला 50 कोटींचा फायदा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलमधील उर्वरित 31 सामने युएईच्या मैदानात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 17 सप्टेंबरपासून 10 ऑक्टोबर दरम्यान हे सामने खेळवण्याची शक्यता आहे. मागील वर्षी संपूर्ण स्पर्धा युएईच्या मैदानात रंगली होती. यावेळी अमिरात बोर्डाला बीसीसीआयने तब्बल 98.5 कोटी इतकी रक्कम दिली होती. यावेळी त्यांना 50 कोटींचा फायदा होऊ शकतो.

ऑस्ट्रेलियन संघाच्या व्यस्त वेळापत्रकाचा अडथळा

ऑस्ट्रेलियन संघ जूनच्या अखेरीस वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना आणि अ‍ॅशेस मालिका आणि बांगलादेशचा दौरा यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध असतील का? असा प्रश्न निर्माण झालाय. यासंदर्भातील अंतिम निर्णय ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड घेईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT