ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या बड्या खेळाडूंचा IPLचे उर्वरित सामने खेळण्यास नकार
IPL 2021 in UAE: भारतीय संघाचा सध्या इंग्लंड दौरा (Team India tour of England) सुरू आहे. या दौऱ्यानंतर भारतीय खेळाडू (Indian Players) आणि इतर खेळाडू युएईमध्ये दाखल होणार आहे. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून IPL 2021 स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या आधी कोणकोणते खेळाडू स्पर्धेसाठी उपलब्ध (Availability) आहेत याची चाचपणी प्रत्येक संघ करत आहे. कोलकाता (KKR), राजस्थान (RR), बंगळुरू (RCB), पंजाब (PBKS) या संघातील बड्या खेळाडूंनी माघार घेतली आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्स संघाकडे मात्र एक चांगली बातमी असल्याची माहिती CSK व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स, अँडम झम्पा, झाय रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, रायली मेरेडिथ या खेळाडूंनी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली असल्याची माहिती आहे. अशा वेळी चेन्नईच्या संघाने मात्र ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पर्धेत खेळणार असल्याची खुशखबर चाहत्यांना दिली. "ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड IPL 2021च्या उर्वरित सामन्यांमध्ये चेन्नईकडून खेळणार आहे. त्याने स्वत: आपण उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात जे खेळाडू वैयक्तिक कारणामुळे किंवा तंदुरूस्त नसल्याने खेळू शकले नव्हते, असे खेळाडू आता तंदुरूस्त असतील तर ते दुसऱ्या टप्प्यात खेळू शकतील, असं BCCI ने सांगितलं आहे. त्यातच हेजलवूडचा सध्याचा फॉर्म लक्षात घेता चेन्नईसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल", अशी माहिती CSKचे CEO कासी विश्वनाथ यांनी दिली.
स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या दमदार खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले. गुरूवारी ऑस्ट्रेलियाने टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. १५ खेळाडूंच्या चमूमध्ये काही बड्या खेळाडूंना संधी मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या १५ सदस्यीय संघात जोश इग्लिस या खेळाडूलाही स्थान देण्यात आले. तसेच, जोश हेजलवूडचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाचा १५ जणांचा संघ
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), एश्टन अगार, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनीस, मिचेल स्वीपसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, एडम झम्पा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.