सनरायझर्स हैदराबादने डेविड वॉर्नरकडून कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर त्याला संघातूनही बाहेर ठेवले. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात डेविड वॉर्नर वॉटर बॉयच्या रुपात दिसला. यावरुन वॉर्नर चांगलाच चर्चेतही आला. अंतर्गत वादामुळे त्याच्यावर ही वेळ आली आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि जलदगती गोलंदाज डेट स्टेन याने म्हटले आहे.
क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीमध्ये वॉर्नसंदर्भात सुरु असलेल्या अंतर्गत वादावादीच्या मुद्यावर डेल स्टेनने परखड मत व्यक्त केले. तो म्हणाला की, वॉर्नर प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे हा आश्चर्यकारक निर्णय वाटतो. सनरायझर्स हैदराबाद पुढील हंगामाच्या दृष्टीने केन विल्यमसनकडे कॅप्टन्सी दिली असेल तर त्यात कोणतीही शंका नाही. पण वॉर्नरला संघातूनच वगळणे हे न पटण्याजोगे आहे. तो आजही एक सर्वोत्तम फलंदाज आहे. जर मी संघ निवडला असता तर डेविड वॉर्नरला बाहेर बसवलेच नसते.
डेविड वॉर्नरने टीम मॅनेजमेंटच्या भूमिकेवर काही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते का? हे माहित नाही. पण मनीष पांड्येला बाहेर बसवण्याच्या निर्णयावरुन टीम व्यवस्थापन आणि कॅप्टनमध्ये काही तरी निश्चितच झाले आहे. जो टीमचा कॅप्टन असतो त्याला संघासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार असावे लागतात. वॉर्नरच्या बाबतीत बंद दरवाज्यामागे काहीतरी मोठं प्रकरण शिजत असावे, असे मत डेल स्टेन याने व्यक्त केले आहे. डेविड वॉर्नर ऑरेंज आर्मीकडून पुढच्या हंगामात दिसणार नाही, अशी भविष्यवाणीही डेल स्टेन याने केलीये.
वॉर्नर आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे कोट टॉम मूडी यांच्यात अंतर्गत वाद सुरु असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. प्लेइंग इलेव्हनची निवड करताना कोच आणि कॅप्टन यांच्यात कधीही एकमत होत नाही. मनिष पांड्येला बाहेर बसवून विराट सिंहला दिलेल्या संधीनंतर वॉर्नर आणि टॉम मूडी यांच्यातील दरी आणखी वाढली होती. त्यात सातत्याने संघाला मिळालेल्या पराभवानंतर वॉर्नरची नेतृत्वावरुन उचल बांगडी करण्यात आली. त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान देण्यात आले नव्हते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.