KL Rahul Twitter
क्रीडा

KL राहुलला अपेंडिक्सचा त्रास; हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

पंजाब किंग्जने ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. पोटात दुखत असताना केएल राहुलने औषध घेतले.

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांपूर्वी पंजाब किंग्जला मोठा धक्का बसलाय. पंजाब किंग्जचा कर्णधार आणि सध्याच्या घडीला तुफान कमागिरी करत असलेल्या लोकेश राहुलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोकेश राहुलला अपेंडिक्स त्रास होत असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंजाब किंग्जने ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. पोटात दुखत असताना केएल राहुलने औषध घेतले. त्याचा कोणताही परिणाम होत नसल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या आजारातून सावरुन तो पुन्हा खेळताना दिसणार की त्याच्यावर स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ येणार हे पुढच्या तपासणीनंतरच कळेल.

आयपीएलमधून बाहेर पडला तर पंजाबचं टेन्शन वाढेल

जर केएल राहुलवर शस्त्रक्रिया झाली तर त्याच्यावर स्पर्धेला मुकण्याची वेळ येऊ शकते. या परिस्थितीत पंजाबच्या संघाचे टेन्शन निश्चितच वाढेल. पंजाबच्या संघाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्याच्यावरील उपचार आणि तो याला कसा प्रतिसाद देणार यावर सगळं गणित अवलंबून असेल. पंजाबचा संघ 7 सामन्यातील 3 विजयासह 6 गुणांसह पाँइट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. केएल राहुल सध्या दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. 14 व्या हंगामातील 7 सामन्यात केएल राहुलने सर्वाधिक 331 धावा केल्या असून ऑरेंज कॅप त्याच्याकडेच आहे. त्याने आतापर्यंत 4 अर्धशतकेही झळकावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Uddhav Thackeray: सरकार कुणी पाडलं, राज ठाकरेंबरोबर जाणार का? उद्धव ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT