CSK-Off-to-UAE 
क्रीडा

IPL 2021: अडथळ्यांची शर्यत पार करून CSKचा संघ अखेर युएईला रवाना

IPL 2021: अडथळ्यांची शर्यत पार करून CSKचा संघ अखेर युएईला रवाना धोनीचा संघ जाण्यास सज्ज असताना आली होती एक वेगळीच अडचण IPL 2021 MS Dhoni led Chennai Super Kings depart for United Arab Emirates vjb 91

विराज भागवत

धोनीचा संघ जाण्यास सज्ज असताना आली होती एक वेगळीच अडचण

IPL 2021: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या CSK संघाने IPL2021च्या उर्वरित हंगामासाठी तयारी सुरू केली. IPL 2020मध्ये CSKला फारसे यश मिळू शकले नाही. IPL 2021च्या स्पर्धेत CSKने दमदार कामगिरी केली होती. पण कोरोनामुळे (Corona) स्पर्धा थांबवण्यात आली. १९ सप्टेंबरपासून IPL 2021चा दुसरा टप्पा (Remaining Matches) सुरू होत असून त्यासाठी धोनी दोन दिवसांपूर्वी चेन्नईत दाखल झाला. CSKचा संघ युएईला रवाना होण्यासाठी आला खरा पण त्यांच्या पुढ्यात एक वेगळीच अडचण उभी ठाकली होती. अखेर अडथळ्यांची शर्यत पार करून आज CSKचा संघ युएईला रवाना झाला.

काय होती अडथळ्यांची शर्यत

CSKचा संघ बुधवारी युएईला जाणार असं ठरलं होतं. पण युएईमध्ये उतरण्यासाठी CSKच्या खेळाडूंना परवानगीच देण्यात आली नव्हती. CSKचे CEO कासी विश्वनाथ यांनी सांगितले की, CSKचा संघ युएईमध्ये जाण्यास सज्ज आहे, पण आम्हाला परवानगीच मिळालेली नाही. सातत्याने BCCI ला आम्ही विचारणा करत आहोत. BCCI देखील युएईतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून आहे. आम्हाला बुधवारी परवानगी मिळेल असं सांगितलं होतं पण त्याला आता उशिरा होताना दिसतोय. त्यांनी ही बाब सांगितल्यानंतर BCCIकडून अखेर त्यांना आज परवानगी मिळाली आणि आज CSKचा संघ रवाना झाला.

CSKच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, सुब्रमण्यम बद्रीनाथ, रॉबिन उथप्पा आणि इतर खेळाडू बॅग पॅक करून रवाना होत असल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. काही खेळाडू आपल्या कुटुंबासोबतही असल्याचे दिसत आहे. १९ सप्टेंबरला मुंबईविरूद्ध चेन्नईचा पहिला सामना असणार आहे. सध्याच्या गुणतक्त्यानुसार, चेन्नईचा संघ १० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे तर मुंबई ८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT