RCB PTI
क्रीडा

IPL 2021, RCB vs RR : बंगळुरुचा विजयी चौकार

दुसरीकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान स्पर्धेतील दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल.

सकाळ डिजिटल टीम

IPL 2021, RCB vs RR : राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेले टार्गेट बंगळुरुच्या सलामी जोडीने सहज पार केले. या सामन्यातील दिमाखदार विजयासह बंगळुरुन सलग चौथा विजय नोंदवला असून गुणतालिकेत टॉपला उडी मारली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या राजस्थानने निर्धारित 20 षटकात 9 बाद 177 धावा केल्या होत्या.  

IPL 2021, RCB vs RR : राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेले टार्गेट बंगळुरुच्या सलामी जोडीने सहज पार केले. या सामन्यातील दिमाखदार विजयासह बंगळुरुन सलग चौथा विजय नोंदवला असून गुणतालिकेत टॉपला उडी मारली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या राजस्थानने निर्धारित 20 षटकात 9 बाद 177 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने बंगळुरुच्या डावाला सुरुवात केली. या गड्यांना बाद करण्यात राजस्थानच्या एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही. देवदत्त पडिक्कलने 52 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने नाबाद 101 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला विराट कोहलीने 47 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 72 धावांची खेळी केली.

टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना रॉयल चॅलेंजर्सच्या गोलंदाजांसमोर राजस्थान रॉयल्सच्या संघातील आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. धावफलकावर अवघ्या 43 धावा असताना कर्णधार संजू सॅमसनसह 4 गडी तंबूत परतले होते. त्यानंतर शिवम दुबेने 32 चेंडूत केलेली 46 धावांची खेळी. रियान परागच्या 16 चेंडूतील झटपट 25 धावा आणि राहुल तेवतियाने केलेल्या 23 चेंडूतील 40 धावांच्या जोरावर राजस्थाने 9 बाद 177 धावांपर्यंत मजल मारली होती.

  • 170-9 : चेतन साकारियाच्या रुपात हर्षल पटेलच्या खात्यात आणखी एक विकेट

  • 170-8 : हर्षल पटेलने क्रिस मॉरिसला 10 धावांवर दाखवला तंबूचा रस्ता

  • 170-7 : 23 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 40 धावा करुन राहुल तेवतिया परतला, मोहम्मद सिराजला मिळाले यश

  • 133-6 : रिचर्डसनने शिवम दुबेला धाडले माघारी, त्याने 32 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने महत्वपूर्ण अशा 46 धावा केल्या

  • 43-4 : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनही माघारी, 18 चेंडूत 21 धावा करुन वॉशिंग्टनचा शिकार

  • 18-3 : डेविड मलान स्वस्तात माघारी, सिराजने त्याला खातेही उघडू दिले नाही

  • 16-2 : मनन वोहरा 7 (9) पुन्हा फेल, जेमिनसनने घेतली विकेट

  • 14-1 : सिराजने उडवल्या बटरलच्या दांड्या, 8 चेंडूत 8 धावा करुन माघारी

Rajasthan Royals (Playing XI): जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (विकेट किपर/ कॅप्टन), शिवम दुबे, डेविड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, चेतन साकारिया, मुस्तफिझुर रहमान.

Royal Challengers Bangalore (Playing XI): विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पदिक्कल, शहाबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमिसन, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

विराट कोहलीने टॉस जिंकला, पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT