sourav ganguly google
क्रीडा

IPL 2021: आता स्पर्धा UAE त होणार? गांगुली म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत बायो-बबलच्या (bio bubble) सुरक्षा कवचात सुरु असलेली आयपीएल (IPL 2021 Postponed) स्पर्धा स्थगित करण्यात आलीये. त्यामुळे आता मोठा पैसा खर्च करुन निर्माण करण्यात आलेल्या 'बायो-बबल'वर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. खेळाडूंनी शिस्त पाळली नाही का? अशी शंकाही निर्माण केली जात आहे. यासंदर्भात आता बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मौन सोडले आहे. बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव कसा झाला हे समजणे मुश्किल असल्याचे मत गांगुलींनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी स्पर्धेदरम्यान कोणत्याही खेळाडूंनी नियमाचे उल्लंघन केलेले नाही, असा दावाही केला. आयपीएल स्पर्धेचे नियोजन भारतात करण्याचा निर्णय योग्यच होता, यावरही त्यांनी भर दिला.

आयपीएल 2021 च्या स्पर्धेतील जवळपास निम्मे सामने झाल्यानंतर स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली. काही खेळाडूंना कोरोनाची लागण (Covid 19 Cases) झाल्याचे समोर आल्यानंतर आयोजकांनी स्पर्धा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल स्पर्धेसाठी जैव सुरक्षित वातावरण तयार करण्यात आले होते. विशेष खबरदारीसह नियोजित स्पर्धेतील बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव नेमका कसा झाला? याचे उत्तर गांगुली यांच्याकडे नाही.

गांगुली बायो-बबलमध्ये झालेल्या कोरोना शिरकावासंदर्भात म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या अहवालानुसार कोणत्याही खेळाडूने बायोबबलच्या नियमाचे उल्लंघन केलेले नाही. कोरोनाचा शिरकाव कसा झाला हे सांगणे कठिण आहे. देशात किती लोकांना कोरोनाची लागण झालीये याची नेमकी आकडेवारी मिळवणेही मुश्किल असल्याचे गांगुली यावेळी म्हणाले. आयपीएलचे नियोजन करण्यात आले त्यावेळी देशातील परिस्थिती बिकट नव्हती. कोरोना रुग्ण संख्य कमी असल्यामुळे भारतात स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे तो निर्णय योग्यच होता, असे गांगुलींनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युएईमध्ये स्पर्धा घेण्यासंदर्भातही चर्चा झाली. पण फेब्रुवारीमध्ये देशातील रुग्ण संख्या नियंत्रणात आली होती. इंग्लंडच्या भारत दौराही यशस्वीरित्या पार पडला. त्यामुळे आयपीएल स्पर्धा याच ठिकाणी घेण्याचा अंतिम निर्णय झाला, असे स्पष्टीकरण गांगुली यांनी दिले.

उर्वरित सामन्यांसदर्भात काहीच सांगता येणार नाही

गांगुली यांनी इंडियनएक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पर्धेसंदर्भात माहिती दिली. मागील तीन आठवड्यात देशातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनकरित्या वाढत आहे. यावेळी गांगुली यांना उर्वरित सामने युएईत घेण्यात येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासंदर्भात आताच काही सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.

IPL 2021 sourav ganguly on how it reached covid 19 in ipl bio bubble

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

तो सरळ सरळ खोटं... गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर नीलमने सोडलं मौन; म्हणते- ते सगळं फक्त

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

SCROLL FOR NEXT