आयपीएलच्या आगामी हंगामात (IPL 2022) नवे भिडू नवा संघ असे चित्र अनुभवायला मिळणार आहे. दोन नव्या संघांनीही संघबांधीच्या रणनितीला सुरुवात केली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू आणि आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएलमध्ये झळकलेल्या हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गळ्यात कॅप्टन्सीची माळ पडणार आहे. नव्या फ्रेंचायझींचा कॅप्टन होणार असल्याचे बोलले जात आहे. फ्रेंचायझीकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण नेहराला कोच नियुक्त करण्याच्या निर्णयासोबतच अहमदाबाद संघाने (Ahmedabad franchise) हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
हार्दिक पांड्या हा मुंबईमध्ये येऊन स्टार झाला. मुंबई इंडियन्सने दिलेल्या संधीनंतर त्याची टीम इंडियात एन्ट्री झाली. पण तो मुळचा गुजरातमधील बडोद्याचा आहे. त्यामुळेच अहमदाबाद संघ त्याच्याकडे नेतृत्व देणार असल्याचे समजते. जर ही गोष्ट खरी ठरली तर पहिल्यांदाच तो एखाद्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
आगामी हंगामात (IPL 2022) पहिल्यांदाच आयपीएलच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज असलेल्या अहमदाबाद फ्रेंचायझीनं याआधी अशीष नेहरा (Ashish Nehra) यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याचे वृत्त समोर आले होते. अहमदाबाद फ्रेंचायझी आणि नेहरा यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली असून लवकरच ते यासंदर्भातील घोषणा करतील, अशी बातमी समोर आली होती.
आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी विद्यमान संघाने खेळाडूंना रिटेन करण्याची प्रक्रिया पार पडली. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला रिलिज केले होते. पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकवणाऱ्या मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah), सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि केरॉन पॉलार्ड (Kieron Pollard) यांच्यावर विश्वास टाकला होता. त्यानंतर हार्दिक पांड्याने एक भावनिक पोस्ट शेअर करत पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसणार नाही, याचे संकेत दिले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.