IPL 2022: आयपीएलचा 15 वा हंगाम 26 मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामातील साखळी फेरितील सामने महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्याच्या मैदानात खेळवण्यात आहेत. आगामी हंगामात 10 संघ असणार आहेत. पुर्वीचे आठ आणि गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स हे दोन नवे संघ पहिल्यांदा मैदानात उतरतील. दहा संघ असल्यामुळे दोन गटात सामने होणार आहेत.आयपीएलच्या हंगामातील 55 सामने मुंबईतील वेगवेगळ्या मैदानात नियोजित आहेत. याशिवाय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील गहुंजे मैदानातही 15 सामने खेळवण्यात येतील. प्ले ऑफच्या लढती या जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदाना असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगतील. (IPL 2022 Matches Latest News 25 percent crowds permission inside Pune Mumbai stadiums Report)
आयपीएल स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्रात होणार असल्यामुळे प्रेक्षकांना स्टेडियमवर जाऊन सामने पाहता येणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. राज्यातील कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात आली आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. 2022 मध्ये होणाऱ्या आयपीएल हंगामातील सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश देणायात यावा, अशी मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MHCA) यांनी केली होती. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात सकारात्मकता दाखवली आहे. IPL साठी मदत करणार असल्याच आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
याशिवाय IPL सामन्यासाठी 25 टक्के मर्यादित प्रक्षकांना परवानगी मिळेल, याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे किमान आगामी हंगामात मर्यादित संख्येत प्रेक्षक दिसतील, अशी अपेक्षा आहे. राज्य सरकार फायनली काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापुर्वी कोरोनामुळे आयपीएलचे सामने ही UAE ला स्थलांतरित करण्यात आले होते. एवढेच नाही तर भारतीय संघाने यजमानपद भुषवलेली टी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही युएईत घेण्याची वेळ बीसीसीआयवर आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.