IPL 2023 Auction : आयपीएलचा लिलाव येत्या २३ डिसेंबर रोजी कोची येथे पार पडणार आहे. याप्रसंगी तब्बल ४०५ खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. इंग्लंडने नुकताच टी-२० विश्वकरंडक जिंकला असून या संघातील बेन स्टोक्स, सॅम करन, ख्रिस जॉर्डन यांचाही लिलावात समावेश आहे. स्टोक्स, करन, जॉर्डन या विश्वविजेत्या खेळाडूंसह कॅमरून ग्रीन या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूंवर कोट्यवधी बोली लागण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या लिलावात ४०५ खेळाडू असणार आहेत. यापैकी २७३ खेळाडू हे भारतीय असतील. तसेच १३२ खेळाडू हे परदेशी असणार आहेत. शिवाय चार खेळाडू संलग्न देशातील असणार आहेत. यापैकी ११९ खेळाडू हे देशासाठी खेळलेले आहेत. २८२ खेळाडूंनी अद्याप देशाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. ८७ खेळाडूंच्या जागा भरायच्या असून यापैकी ३० परदेशी खेळाडूंसाठी असणार आहेत.
परदेशी खेळाडूंवर सर्वाधिक बोलीची शक्यता परदेशातील १९ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी इतकी आहे. त्यामुळे सर्वाधिक बोली याच खेळाडूंवर लावण्यात येण्याची शक्यता आहे.
मनीष पांडे, मयंक अग्रवालची मूळ किंमत १ कोटी
एक कोटी बेस प्राईज अर्थातच मूळ किंमत असलेले २० खेळाडू आहेत. यामध्ये मनीष पांडे व मयंक अग्रवाल या दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. अजिंक्य रहाणेला गेल्या काही काळात सुमार फॉर्ममधून जावे लागत आहे. त्यामुळे आयपीएलच्या लिलावातही त्याची मूळ किंमत ५० लाख इतकीच ठेवण्यात आली आहे. त्याच्यावर बोली लागण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, दीड कोटी मूळ किंमत असलेले ११ खेळाडू आहेत.
मूळ किंमत दोन कोटी असलेले खेळाडू
रायली रोसो, केन विल्यमसन, सॅम करन, कॅमरुन ग्रीन, जेसन होल्डर, बेन स्टोक्स, टॉम बँटन, निकोलस पुरन, फिल सॉल्ट, ख्रिस जॉर्डन, ॲडम मिल्न, अदिल रशीद, ट्रेव्हीस हेड, रॅसी वॅन डर ड्युसेन, जेम्स निशाम, ख्रिस लीन, जॅमी ओव्हर्टन, क्रेग ओव्हर्टन, तायमल मिल्स.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.