IPL 2023 ben-stokes-of-csk-hit-sky-high-sixes-in-his-very-first-practice-session video  sakal
क्रीडा

IPL VIDEO : CSKचे 16.25 कोटी नाही जाणार पाण्यात...! गगनाला भिडणारे गगनचुंबी षटकारचा व्हिडिओ व्हायरल

Kiran Mahanavar

IPL 2023 CSK VIDEO : क्रिकेट जगाला सध्या इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचे वेध लागले आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा थरार येत्या 31 मार्चपासून सुरू होणार आहे. असे असतानाच CSKचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचा आहे.

बेन स्टोक्सने शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगच्या 2023 आवृत्तीची तयारी सुरू केली. तो चेपॉक स्टेडियमवर फ्रँचायझीसह त्याच्या पहिल्या सराव सत्रात सहभागी झाला होता. गेल्या डिसेंबरमध्ये मिनी लिलावात स्टोक्सला CSK ने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले.

स्टोक्सने शुक्रवारी सकाळी चेन्नई गाठली आणि संध्याकाळी सराव सत्राला सुरुवात केली. त्याने ओपन-नेट सत्रात दोन जबरदस्त षटकारही मारले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्टोक्सने उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाच्या डोक्यावर पहिला षटकार आणि लाँग ऑफवर दुसरा षटकार मारला.

स्टोक्स आयपीएल 2022 मध्ये खेळला नाही आणि त्यामुळे त्याचे नाव मेगा लिलावासाठी ठेवले नाही. 2021 मध्ये आयपीएलच्या एका सामन्यात त्याच्या बोटाला दुखापत झाली आणि उर्वरित सामन्यांमधून तो बाहेर पडला. नंतर मानसिक आरोग्याच्या कारणांमुळे त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि IPL 2021 च्या UAE लेगमध्ये खेळला नाही.

आयपीएल 2023 हंगामातील काही सामने गमावू शकतो कारण त्याला ऍशेस सुरू होण्यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी इंग्लंडला परतायचे आहे. मात्र, आता मीडिया रिपोर्टनुसार स्टोक्स चेन्नईसोबत संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज 31 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. तसेच या मोसमातील हा पहिलाच सामना असेल. स्टोक्ससह दीपक चहरच्या पुनरागमनामुळे सीएसकेचा संघ मजबूत झाला आहे. सीएसकेसाठी मागील हंगाम खराब होता. त्यानंतर 14 सामन्यांतून चार विजयांसह संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT