IPL 2023: आयपीएल 2023 मधील रविवार हा सर्वात धमाकेदार दिवस राहिला. दोन नेक-टू-नेक सामने आणि पॉइंट टेबलमध्ये मोठे बदल पाहिला मिळाली. पॉइंट टेबलसोबतच आयपीएलच्या ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या यादीतही महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. आतापर्यंत सीएसकेच्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे असलेली ऑरेंज कॅप आता त्याच्याकडून हिसकावण्यात आली आहे.
आयपीएल 2023ची ऑरेंज कॅप आता पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनकडे आहे. धवनने रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद 99 धावांची शानदार खेळी केली. धवनच्या आता तीन सामन्यांत दोन अर्धशतकांसह 225 धावा आहेत.
दुसरीकडे सीएसकेचा ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या 3 सामन्यात 189 धावा आहेत. या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने 3 सामन्यात 158 धावा केल्या आहेत, या फलंदाजाने 2 अर्धशतकेही ठोकली आहेत.
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर आणि गेल्या वेळचा ऑरेंज कॅप विजेता जोस बटलर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. बटलरने 3 सामन्यात 152 धावा केल्या आहेत. यानंतर लखनऊ सुपरजायंट्सच्या झंझावाती सलामीवीर काइल मेयर्सने आतापर्यंत 3 सामन्यांत 187 च्या स्ट्राइक रेटने 139 धावा केल्या आहेत. आयपीएल 2023 च्या ऑरेंज कॅप यादीतील हे टॉप 5 खेळाडू आहेत.
पर्पल कॅप
राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. चहलच्या नावावर 3 सामन्यात 8 विकेट आहेत. त्याने गेल्या वर्षीही ऑरेंज कॅप जिंकली होती.
दुसऱ्या क्रमांकावर राशिद खान आहे, ज्याने या हंगामातील पहिली हॅट्ट्रिक घेतली. राशिदने 3 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत.
या यादीत लखनऊचा मार्क वुड तिसऱ्या क्रमांकावर आहे. वुडनेही चहल आणि रशीदप्रमाणे केवळ 8 विकेट घेतल्या आहेत.
चौथ्या क्रमांकावर लखनौचा रवी बिश्नोई. त्याने 3 सामन्यात 6 विकेट आहेत.
पाचवे नाव गुजरात टायटन्सच्या अल्झारी जोसेफचे आहे. जोसेफने 3 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.