Mohammed Shami IPL 2024 GT : आयपीएल 2024 लिलावापूर्वी गुजरात टायटन्सचे सीईओ अरविंदर सिंग यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. गुजरातचा माजी कर्णधार हार्दिक पांड्याप्रमाणे मोहम्मद शमीला ट्रेड ऑफ करण्यासाठी देखील इतर फ्रेंचायजींनी संपर्क साधला आहे. अरविंदर सिंह यांच्या मते ज्या प्रकारे इतर फ्रेंचायजींनी शमीशी संपर्क साधला तो प्रकार योग्य नव्हता.
गुजरातच्या सीईओंनी दिलेल्या माहितीनुसार, 'इतर फ्रेंजायजींचे अधिकारी हे संघ व्यवस्थापनाकडे नाही तर कोचिंग स्टाफशी संपर्क साधत आहेत. अशा प्रकारे खेळाडूंशी संपर्क साधणं हे योग्य नाही. हे आयपीएल गव्हर्निंग बॉडी, बीसीसीआयने घालून दिलेल्या नियमांमध्ये बसत नाही.
न्यूज 18 शी बोलाना गुजरात टायटन्सचे सीईओ सिंग यांनी मोहम्मद शमीशी देखील काही फ्रेंचायजींनी संपर्क साधल्याच्या वृत्तावर भाष्य केले. त्यांनी शमीशी काही फ्रेंचायजींनी संपर्क साधल्याचं मान्य केलं. मात्र त्यांनी ज्या प्रकारे त्याच्याशी संपर्क साधला ती चुकीची असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, अशा प्रकारे संपर्क साधणं हे बीसीसीआयच्या आयपीएल ट्रेडिंग नियमांच्या विरूद्ध आहे. सिंग यांनी फ्रेंचायजीचं नाव घेतलं नाही मात्र त्यांनी योग्य मार्गांनी फ्रेंचायजीशी संपर्क साधणं गरजेचं असल्याचे सांगितले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणं गरजेचं आहे.
सीईओंनी हार्दिक पांड्याने फ्रेंचायजी सोडण्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, गुजरात टायटन्स त्याच्या निर्णयाचा आदर करतं. त्याच्याबद्दल आमच्या मनात कायम आदर राहील.
डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धीमान साहा, केन विलियमसन, अभिनव मनोहर, बी, साई सुदर्शन, दर्शन नाळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा.
यश दयाल, केसी भरत, शिवम मावी, उर्वशी पटेल, प्रदीप सांगवान, ओडेन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दसुन शानका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.