IPL 2024 Can Shift Out of India 
क्रीडा

मोठी बातमी! 2024 मध्ये IPL होणार भारताबाहेर?, मोठे कारण आले समोर

Kiran Mahanavar

IPL 2024 Can Shift Out of India : इंडियन प्रीमियर लीग ही एक अशी लीग आहे ज्याची सर्वांनाच प्रतीक्षा असते. ही लीग भारतात खूप पसंत केली जात असून चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या लीगच्या पुढील हंगामाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

आयपीएल 2024 लवकरच आयोजित केले जाऊ शकते. परदेशातही त्याचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. याचे कारण पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका आहे. स्पोर्ट्स तकने आपल्या अहवालात याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत अहवालात असे सांगण्यात आले आहे की, लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल एकतर पटकन करता येईल किंवा गरज पडल्यास ते इतर देशातही करता येईल.

सूत्राने सांगितले की, पुढील वर्षी निवडणुका आहेत आणि ही बाब अधिकाऱ्यांच्या मनात आहे. बीसीसीआय आयपीएल-2024 मे मध्ये संपवण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्राने असेही सांगितले की, अजून बराच वेळ आहे आणि यावेळी संपूर्ण लक्ष 5 ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या विश्वचषकावर आहे.

गरज भासल्यास आयपीएल-2024 भारताबाहेर इतर कोणत्याही देशात आयोजित केले जाऊ शकते, मात्र ते केवळ भारतातच आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

पण जर परिस्थिती अशी असेल की भारतात आयोजन करणे अवघड होत असेल तर परदेशातही आयोजन करणे हा एक पर्याय आहे. यापूर्वी 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. त्या वर्षीही निवडणुका असल्याने हा निर्णय घेण्यात आला. यानंतर 2014 मध्ये जेव्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तेव्हा IPL चे काही सामने भारतात तर काही सामने UAE मध्ये झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT