IPL 2024 Cameron Green Royal Challengers Bangalore  
क्रीडा

IPL 2024 : अंबानींनी केला १७ कोटींच्या खेळाडूचा त्याग! आता 'लाल' जर्सीत दिसणार 'ग्रीन'

Kiran Mahanavar

IPL 2024 Cameron Green Royal Challengers Bangalore : स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स सोबतचा प्रवास संपला आहे. हार्दिक आता पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा हात धरला. मुंबईने ट्रेड विंडोच्या माध्यमातून हार्दिक पांड्याचा संघात समावेश केला आहे. हार्दिकने 2015 मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएल करिअरला सुरुवात केली होती.

हार्दिक पांड्याला करारबद्ध करण्यासाठी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला 15 कोटी रुपये दिले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाकडे हार्दिक पांड्याला परत आणण्यासाठी पुरेसा पैसा नव्हता. अशा स्थितीत अंबानींनी 17 कोटींच्या खेळाडूचा त्याग केला. मुंबई इंडियन्सने कॅमेरून ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध ट्रेड केले.

गेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपयांची बोली लावून कॅमेरून ग्रीनला विकत घेतले होते. आता मुंबईने हार्दिक पांड्याचा समावेश करण्यासाठी ग्रीन सोडली. ग्रीनच्या ट्रेडमुळे मुंबईला 17.50 कोटी रुपये मिळाले, ज्यामुळे हार्दिक पांड्याचा परतीचा मार्ग मोकळा झाला.

आयपीएल 2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्रीनला 17.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यानंतर त्याने आयपीएल 2023 मध्ये मुंबईसाठी चांगली कामगिरी केली. त्याने 16 सामन्यांत 452 धावा केल्या ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 6 विकेट्सही घेतल्या. आता रोहित शर्माचा हा खेळाडू विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये गेला आहे.

आरसीबी संघाने अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. आरसीबीने तीनदा अंतिम फेरी गाठली होती, पण संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. यावेळी आयपीएल 2024 लिलावापूर्वी आरसीबीने 11 खेळाडूंना सोडले आहे. शाहबाज अहमदच्या बदल्यात सनरायझर्स हैदराबादकडून मयंक डागरला खरेदी करण्यात आले आहे.

आरसीबीने सोडलेले खेळाडू : वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव.

आरसीबीने कायम ठेवलेले खेळाडू : फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर (SRH कडून ट्रेड केलेले), विशाल, दीपकुमार विशाल. , मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT