IPL 2023 Auction 
क्रीडा

IPL 2023 Auction: काव्या, सुहाना अन् प्रिती... लिलावावेळी कॅमेरा नुसता भिरभिरणार

Kiran Mahanavar

IPL 2023 Auction : इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या आवृत्तीसाठी खेळाडूंचा लिलाव आज दुपारी 2:30 वाजता कोची येथील हयात हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. लिलावात सर्व 10 संघ त्यांच्या गरजा आणि बजेटनुसार पैज लावतील. आयपीएल लिलावात केवळ खेळाडूच नाही तर संघ मालकही चर्चेत राहतात.

कोलकाता नाईट रायडर्सचा लिलाव टेबल नेहमी त्याच्या मालकांमुळे चर्चेत राहिला आहे. शाहरुख खान आणि जुही चावला शेवटच्या लिलावात आले नाहीत, तरीही केकेआरचे टेबल ट्रेंडमध्ये राहिला होता. याचे कारण टेबलवर स्टारची उपस्थिती होती. शाहरुखची मुलं सुहाना खान, आर्यन खान आणि जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहता त्यांच्या व्यवस्थापनासह संपूर्ण वेळ लिलावात उपस्थित होती.

सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण असलेल्या काव्या मारनवर लिलावात कॅमेऱ्यांचे बरेच लक्ष आहे. काव्या सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्ह नाही किंवा इतर प्रसंगी ती दिसत नाही. ती फक्त आयपीएल सामने आणि लिलावादरम्यानच दिसते. लोकांना त्याच्याबद्दल खूप रस आहे. काव्या यावेळीही कोचीला पोहोचली आहे.

पंजाब किंग्स संघाची मालकीण प्रीती झिंटा शेवटच्या आयपीएल लिलावात आली नव्हती, परंतु यावेळी ती टेबलवर दिसू शकते. बॉलीवूड स्टार प्रीती अनेकदा लिलावात इतर संघांच्या व्यवस्थापनासोबत फ्लर्ट करते. मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी देखील चर्चेत असतात जी नेहमी आपल्या मुलांसोबत लिलावात उपस्थित असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT