MI vs CSK IPL 2023 esakal
क्रीडा

IPL : बेजबाबदार फलंदाजी मुंबईच्या मुळावर

एकतर्फी सामन्यात चेन्नईचा सहा विकेटने विजय

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई - फलंदाजीतील अफलातून कामगिरीमुळे गेल्या दोन सामन्यांत शानदार विजय मिळवणाऱ्या मुंबईच्या फलंदाजीची गाडी मात्र रुळावरून घसरली. केवळ १३९ धावाच त्यांना करता आल्या आणि चेन्नईने हा सामना जिंकत सहा विकेटने एकतर्फी विजय मिळवला.

भरभक्कम फलंदाजी हा मुंबईचा गड आहे; पण चेन्नईच्या गोलंदाजांनी विकेट काढण्यापेक्षा मुंबईच्या फलंदाजांनी स्वतःच खराब फटके मारून आपला बुरुज ढासळू दिला. नेहाल वधेरा या नवख्या फलंदाजाने अर्धशतक केले, त्या वेळी इतर नामांकित फलंदाजांनी शरणागती स्वीकारली.

रोहितचा दुसरा भोपळा

मुळात मुंबई संघ व्यवस्थापनाने क्रमवारीत बदल करून घडी विस्कटली. रोहित शर्माऐवजी कॅमेरून ग्रीनला सलामीला पाठवले तो तेथे सहाच धावा करू शकला, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा रोहित सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. ईशान किशनही विकेट बहाल करून परतल्यामुळे मुंबईची अवस्था पहिल्या १७ चेंडूत ३ बाद १४ अशी झाली. तेथेच मुंबईला मोठ्या धावसंख्येसाठी कष्ट करावे लागणार, हे निश्चित झाले.

नेहाल वधेराला सूर्यकुमारऐवजी बढती देण्यात आली. तो एका बाजूने अर्धशतकी खेळी सजवत होता; परंतु सूर्यकुमार आणि यंदा प्रथमच संधी मिळालेल्या त्रिस्टन स्टब्स यांना प्रयत्न करूनही फटकेबाजी करता येत नव्हती.

फॉर्मात असलेल्या चेन्नई संघासाठी १४० धावांचे आव्हान कठीण नव्हते. त्यातच ऋतुराज गायकवाडने १६ चेंडूत ३० धावांची स्फोटक खेळी केली. डेव्हन कॉन्वेही आक्रमक फलंदाजी करत होता.

त्यामुळे दहा धावांच्या सरासरीने चेन्नईचा धावफलक धावत होता. या दोघांनंतर अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू फारशी चमक दाखवू शकले नाहीत; मात्र मूळचा मुंबईकर फलंदाज शिवम दुबे मैदानात आला आणि त्याने षटकारांची बरसात करत मुंबईच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आणल्या.

संक्षिप्त धावफलक :

मुंबई इंडियन्स ः २० षटकांत ८ बाद १३९ (ईशान किशन ७, कॅमेरुन ग्रीन ६, रोहित शर्मा ०, नेहाल वधेरा ६४ - ५१ चेंडू, ८ चौकार, १ षटकार, सूर्यकुमार यादव २६ - २२ चेंडू, ३ चौकार, त्रिस्तन स्टब्स २०, टीम डेव्हिड २, दीपक चहर ३-०-१८-२, तुषार देशपांडे ४-०-२६-२, मतिशा पथिराना ४-०-१५-३) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्स ः १७.४ षटकांत ४ बाद १४० (ऋतुराज गायकवाड ३० -१६ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, डेव्हन कॉन्वे ४४ -४२ चेंडू, ४ चौकार, शिवम दुबे २६ -१८ चेंडू, ३ षटकार, पीयूष चावला ४-०-२५-२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT