IND vs AUS WTC Final 2023 : आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग 2008 मध्ये सुरू झाली. आयपीएलचे ब्लॉकबास्टर यश, काही सामन्यांसाठी खेळाडूंना दिलेली मोठी रक्कम यामुळे क्रिकेटला सात समुंदर पार नेले.
जगातील सर्व देश फ्रँचायझी क्रिकेटचे आयोजन करत आहेत आणि मोठ्या रकमेसाठी आंतरराष्ट्रीय स्टार्सशी संपर्क साधत आहेत, त्यामुळेच खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा फ्रँचायझी क्रिकेटला महत्त्व देत आहेत.
टी-20 मध्ये जास्तीत जास्त 4 षटके आणि 120 कायदेशीर चेंडू टाकल्याने 5 दिवसीय कसोटीची मज्जा कमी झाली आहे. बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे 3 तासांत संपणाऱ्या सामन्यांमुळे केवळ कसोटीचा उत्साह कमी झाला नाही, तर टी-20 किंवा एकदिवसीय प्रकारात फिट होण्यासाठी खेळाडूंचा फिटनेसही कमी झाला आहे.
भारतीय खेळाडू आता दरवर्षी 2 महिने दीर्घ कालावधीसाठी IPL खेळतात. त्याचा परिणाम आता थेट टीम इंडियाच्या कामगिरीवर होत आहे. खेळाडू पैसे कमावण्यासाठी या लीगचा भाग बनतात आणि काहीवेळा जखमी होतात. याचा फटका आंतरराष्ट्रीय संघांना सहन करावा लागत आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे केएल राहुल आणि केन विल्यमसन जे आयपीएल 2023 मध्ये जखमी झाले होते.
याशिवाय 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. असे असतानाही बीसीसीआयने 2 महिने आयपीएल आयोजित केले ज्यामध्ये सध्याच्या भारतीय संघातील जवळपास प्रत्येक खेळाडू भाग होता.
याचा परिणाम असा झाला की टीम इंडियाच्या खेळाडूंना आयपीएलमधून सावरण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि लंडनला येताच त्यांना पुन्हा सराव करावा लागला, त्यामुळे मोठ्या सामन्यपूर्वी ते फ्रेश राहू शकले नाहीत.
आणखी एक आयसीसी ट्रॉफी गमावणार?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्या दिवशी टीम इंडिया ऑस्ट्रेलियासमोर खूपच कमकुवत दिसत होती. यामागचे मुख्य कारण पुढे येत आहे की, फायनलसाठी खेळाडूंना नीट सराव करण्यासाठी वेळ मिळाला नाही की विश्रांतीसाठीही पुरेसा वेळ मिळाला नाही. यामुळे संघाला पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करता आली नाही. आता येथून पुनरागमन करणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी असणार नाही.
टीम इंडियाने अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. त्यानंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. याची अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक आयपीएल देखील असू शकतो. कारण 2013 नंतर हळूहळू आयपीएलची क्रेझ वाढत गेली.
संघही वाढले आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा कुठेतरी घसरला. त्यामुळे आयपीएलमुळे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. तथापि बीसीसीआयने यावर थोडा विचार करावा आणि कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी आयपीएल आयोजित होणार नाही याची काळजी घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.