ipl media rights 
क्रीडा

खेळाडूंचं माहित नाही पण BCCI ला प्रत्येक चेंडूवर मिळणार 49 लाख रुपये

BCCI 2023 पासून प्रत्येक IPL सामन्यातून कमावणार 118 कोटी रुपये

Kiran Mahanavar

IPL Media Rights: केवळ क्रिकेटच नव्हे, तर संपूर्ण क्रीडाविश्वात व्यावसायिक लीगमध्ये क्रांती करणाऱ्या आयपीएल प्रक्षेपण हक्क वितरणाचा लिलाव तीन दिवसांनंतर पूर्ण झाला. चार श्रेणीत असलेला हा लिलाव एकूण ४८,३९० कोटी (४८३ अब्ज ९० कोटी) रुपयांचा झाला आहे. पुढील पाच वर्षांसाठी बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी १४३.३२ कोटी रुपये मिळणार आहेत. जिथे प्रत्येक चेंडू वर आता बीसीसीआयला सुमारे 49 लाख रुपये मिळणार आहे. त्याच वेळी प्रत्येक षटकात 2.95 कोटी रुपयांची कमाई होणार आहे. BCCI 2023 पासून प्रत्येक IPL सामन्यातून कमावणार 118 कोटी रुपये आहे.

जगात होत असलेल्या व्यावसायिक लीगमध्ये आयपीएल दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत लीग ठरली आहे, असे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सांगितले. २०२३ ते २०२७ या पाच वर्षांसाठी ही अभूतपूर्व उलाढाल झाली आहे. डिस्ने स्टार अर्थात स्टार स्पोर्टसने दूरचित्रवाणीचे हक्क यंदाही आपल्याकडे राखताना त्यासाठी २३,५७५ कोटी रुपयांची रक्कम मोजली आहे.

यंदाच्या या लिलावात डिजिटल प्रक्षेपण हक्कांनी मोठा भाव खाल्ला आणि त्यात रिलायन्सच्या व्हायकॉमने बाजी मारली. ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीसाठी त्यांनी २३,७५७ कोटी मोजले; ही एकूण रक्कम स्टारच्या दूरचित्रवाणी हक्कांपेक्षा अधिक ठरली. यातील ‘ब’ श्रेणी पूर्णतः भारतीय उपखंडात डिजिटल (२०,५०० कोटी); तर ‘क’ श्रेणी डिजिटल आणि ९८ विशेष सामने पाच वर्षांसाठी (३,२५७ कोटी) अशी असणार आहे. व्हायकॉम येथवरच थांबले नाही तर ‘ड’ श्रेणी (परदेशातील टिव्ही आणि डिजिटल) यातील यातील हक्कही (१०५८ कोटी) त्यांनी मिळवले यात टाइम्स इंटरनेटही वाटा असणार आहे. व्हायकॉम परदेशात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटन येथे प्रसारण करणार आहे.

पुढील पाच वर्षांसाठी दूरचित्रवाणी हक्क २३,५७५ कोटींना मिळवणाऱ्या स्टारने २०१८-२०२२ या गेल्या पाच वर्षांसाठी हेच हक्क १६,३४६ कोटींना मिळवले होते. विशेष म्हणजे यात डिजिटल प्रक्षेपणाचाही समावेश होता. त्या अगोदर २००८ मध्ये आयपीएल सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा वर्षांसाठी सोनीकडे हेच हक्क ८,२०० कोटींना होते.

अशी वाढत जाणार सामन्यांची संख्या...

  • २०२३ : ७४ सामने

  • २०२४ : ७४ सामने

  • २०२५ : ८४ सामने

  • २०२६ : ८४ सामने

  • २०२७ : ९४ सामने

अशी आहे वर्गवारी...

  • ‘अ’ श्रेणी : दूरचित्रवाणी हक्क : स्टार इंडिया : २३,५७५ कोटी

  • ‘ब’ श्रेणी : डिजिटल हक्क : व्हायकॉम : २०,५०० कोटी

  • ‘क’ श्रेणी : डिजिटल आणि दूरचित्रवाणी महत्त्वाचे निवडक सामने : व्हायकॉम : ३,२५७ कोटी

  • ‘ड’ श्रेणी : परदेशातील दूरचित्रवाणी आणि डिजिटल : व्हायकॉम आणि टाइम्स : १,०५८ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT