भारतीय संघातील स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू आहे. धोनीला ओव्हरटेक करुन आगामी काळात तो धोनीचा वारसदार होणार असल्याचे संकेत मेगा लिलावाआधीच मिळाली. चेन्नईने रिटेन केलेला तो पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे शेन वॉर्नलाही (shane warne) आयपीएलच्या पहिल्याच हंगामात रविंद्र जडेजा काय चीज आहे ते कळलं होते. खेळाप्रती असणारी जिद्द आणि चिकाटीमुळे जाडेजानं प्रभावित केले होते. पण वॉर्नला त्याची एक गोष्ट चांगलीच खटकली आणि त्याने रविंद्र जाडेजाला धडाही शिकवला. (IPL Rajashan Royals shane warne on Ravindra Jadeja talen)
रविंद्र जडेजा हा क्षमतेनं भरलेला खेळाडू होता. त्यामुळे आम्ही त्याला बऱ्याच गोष्टीत सूट द्यायचो. काही गोष्टी खपूनही जायच्या. पण त्याचा बेशिस्तपणा हा खपवून घेणं योग्य नव्हता, असा किस्सा शेन वॉर्नने जाडेजाच्या बाबतीत आपल्या 'नो स्पिन' या पुस्तकात लिहून ठेवला आहे. शिस्त नसेल तर युवा खेळाडू भरकटू शकतो. कोणत्याही खेळाडूची एक दोन चुका पदरात घालता येतात. पण त्याच्याकडून वारंवार चूक होत असेल तर त्याला शिक्षा करावी, लागते. त्यामुळेच जाडेजालाही शिक्षा केल्याची आठवण शेन वॉर्नने आपल्या पुस्तकातून मांडली आहे.
जडेजा टॅलेंटेड होता. पण तो वेळ कधीच पाळायचा नाही. स्टेडियममध्ये सरावासाठी हॉटेलमधून बस नऊ वाजता निघली तेव्हा जाडेजा बसमध्ये नसायचा. मैदानातही तो लट आला. ही गोष्ट लक्षात ठेवून शेन वॉर्नने सरावाहून परत येताना त्याला धडा शिकवला. बस वाटेत थांबवून रविंद्र जाडेजासग लेट कमर्सला हॉटेलपर्यंत पायी चालत येण्याची शिक्षा दिली. ज्यावेळी एका खेळाडूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही शिक्षा दिली, असेही वर्णन वॉर्नने आपल्या पुस्तकात करुन ठेवलंय.
2008 च्या आयपीएलमध्ये रविंद्र जडेजा राजस्थानच्या ताफ्यातून खेळत होता. शेन वॉर्न त्याला रॉकस्टार म्हणून बोलवायचा. सध्याच्या घडीला खरंच जाडेजा रॉकस्टार झालाय. पण त्यावेळी जाडेजाही गोंधळून जायचा. रॉकस्टार म्हणजे काय? शेन वॉर्ननं हे नाव का दिलं. हेच त्याला कळायच नाही. वॉर्नने ज्यावेळी पहिल्यांदा त्याला रॉक स्टार म्हटलं त्यावेळी जाडेजाला याचा अर्थही माहित नव्हता. खुद्द जाडेजानेच हा किस्सा शेअर केलाहोता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.