4 IPL Teams Eyes on Australia Tour Of Pakistan End  esakal
IPL

चार IPL संघ पाक-ऑस्ट्रेलिया टूर संपण्यावर बसलेत टपून

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) सुरू झाला असून आतापर्यंत 10 सामने झाले आहेत. मात्र तरीही अजूनही अनेक संघ आपल्या पूर्ण क्षमतेनिशी खेळत नाहीयेत. अनेक संघात विदेशी खेळाडू, दुखापतीतून सावरणारे खेळाडू दाखल व्हायचे आहेत. अजून संघात सामील न झालेल्या विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची (Australian Players) संध्या जास्त आहे. कारण ऑस्ट्रेलिया सध्या पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौऱ्यावर आहे आणि तेथे ते वनडे आणि टी 20 मालिका खेळत आहेत.

टी 20 वर्ल्डकप चॅम्पियन टीम असलेल्या ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलच्या रणांगणात परतल्यानंतर चार संघांना याचा मोठा फायदा होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानात 5 एप्रिलला शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर हे ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात परततील आणि त्यानंतर ते क्वारंटाईन होतील. पाकिस्तानातून येणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंमुळे पुढील चार संघ तगडे होणार आहेत.

  • दिल्ली कॅपिटल्स (David Warner and Mitchell Marsh)

दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या लिलावात डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांना आपल्या गोटात खेचण्यात यश मिळवले होते. यामुळे दिल्लीची सलामी जोडी तगडी होईल. पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर ही जोडी पॉवर प्लेमध्ये धुमाकूळ घालू शकते. त्याचबरोबर मिचेल मार्शमुळे संघातील अष्टपैलूची जागा भरली जाईल. मार्शमुळे दिल्लीची फायर पॉवर तगडी होईल.

  • रॉयल चॅलेंजर बेंगलोर (Glenn Maxwell, Josh Hazlewood and Jason Behrendorff)

आरसीबीच्या संघात तब्बल तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू सामील होणार आहेत. मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज ग्लॅन मॅक्सवेल संघात आल्यानंतर आधीच मजबूत दिसणारी आरसीबीची फलंदाजी अजूनच मजबूत होईल. त्यानंतर आरसीबीसाठी डोकेदुखी ठरणारी त्यांची बॉलिंग देखील हेजवलूड आणि जॉशचा बॅकअप म्हणून घेतलेला जेसन बेहरनफोर्ड देखील गोलंदाजीत आपले योगदान देऊ शकतो.

  • 3 कोलकाता नाईट रायडर्स (Pat Cummins and Aaron Finch)

कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या हंगामात दमदार सुरूवात केली आहे. पाकिस्तान दौऱ्यावरून ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात परतल्यानंतर केकेआरचा संघ अजून मजबूत होईल. कारण त्यांच्या संघात पॅट कमिन्स दाखल होईल. त्यामुळे केकेआरच्या बॉलिंगची धार अजूनच वाढणार आहे. मात्र अॅरोन फिंचला संघात स्थान मिळण्यासाठी वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.

  • 4 लखनौ सुपर जायंट (Marcus Stoinis)

लखनौ सुपर जायंट संघात ऑस्ट्रेलियाचा एकच खेळाडू पण टी 20 स्पेशलिस्ट ऑस्ट्रेलियन खेळाडू येणार आहे. तो म्हणजे मार्कस स्टॉयनिस. स्टॉयनिस लखनौचा कर्णधार केएल राहुलला गोलंदाजीत तीन ते चार षटके काढून देऊ शकतो. तसेच तो बॅटिंगमध्ये फायर पॉवर तगडी करण्यात उपयुक्त ठरेल. तो एक मॅच फिनिशरचा चांगला रोल निभावू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT