जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट उत्सवाला नुकताच प्रारंभ झाला असून यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक क्रिकेटचा महाकुंभ टाटा आयपीएलचा रोमांच अनुभवायला सज्ज झाले आहेत. तीन सीजनच्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा एकदा आयपीएल त्याच्या जुन्या फॉरमॅटमध्ये परत आलंय.
यंदाच्या सीजनचे सर्व सामने हे संघांच्या होम ग्राउंडवर खेळवले जाणार आहेत. यंदाच्या आयपीएलची सर्वात खास गोष्ट म्हणजे आयपीएलच्या यंदाच्या सीजनचे 'जिओ सिनेमा' वर होणारे प्रक्षेपण.
यंदाच्या आयपीएलच्या सिजनची सुरवात अतिशय दमदार झाली असून सुरवातीच्या पहिल्याच आठवड्यात जिओ सिनेमामुळे अनेक रेकॉर्ड या सीजनने करायला सुरवात केली आहे. टाटा आयपीएल २०२३ ने विक्रम करत पहिल्याच विकेंडला १४७ कोटी प्रेक्षकांनी जिओ सिनेमावर सामन्याचा आनंद लुटला आहे.
टाटा आयपीएल २०२३ ने पहिल्याच विकेंडला केलेला व्हियूज रेकॉर्ड गतवर्षीच्या पूर्ण सीजनपेक्षा जास्त असून ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक २०२२ पेक्षा जास्त प्रेक्षक 'जिओ सिनेमा' वर आयपीएल पाहत आहेत.
या पाच कारणांमुळे भारतीय प्रेक्षक त्यांच्या आवडत्या संघाला आणि खेळाडूंना टेलिव्हिजन पेक्षा डिजिटली जिओ सिनेमावर पाहणं पसंत करत आहेत.
१. टाटा आयपीएलचे 4K क्वालिटीमध्ये प्रक्षेपण:
आजपर्यंत पहिल्यांदाच प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या टाटा आयपीएलचे 4K क्वालिटीमध्ये प्रक्षेपण जिओ सिनेमा ऍपने उपलब्ध करून दिले आहे. प्रेक्षक कोणत्याही 4K सपोर्ट करणाऱ्या डिव्हाईस द्वारे सर्वोत्कृष्ट प्रक्षेपण क्वालिटीमध्ये यंदाच्या आयपीएलचे प्रक्षेपण पाहत आहेत.
२. हाईप फिचर:
जिओ सिनेमाने नुकत्याच पार पडलेल्या एसए२० आणि टाटा डब्ल्यूपीएल मध्ये हाईप फिचर लाँच केले होते. परंतु आता टाटा आयपीएलच्या आताच्या सत्रात हे फिचर युजरला सर्वोत्तम सुविधा देत आहे.
या फिचरद्वारे प्रेक्षकांना संघाचे संपूर्ण विश्लेषण, संघाच्या धावसंख्येचा दर, फलंदाजाचा धावसंख्येचा आलेख, गोलंदाजाच्या आलेख, वॅगन व्हील्स आणि इतर सुद्धा आकडेवारी एका क्षणात प्रेक्षकांपर्यंत सामना सुरु असतानाच पाहायची सुविधा या हाईप फिचरमुळे मिळाली आहे.
३. मल्टी कॅम:
जिओ सिनेमावर प्रेक्षकांना वेगवेगळ्या कॅमेरा अँगलवर स्विच करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रेक्षकांना मेन कॅमेरा, केबल कॅमेरा, बर्ड आय कॅमेरा, स्टँम्प कॅमेरा, आणि फलंदाजांचा कॅमेराने कधीही सामना पाहता यावा याची सुविधा फक्त जिओ सिनेमावर उपलब्ध करून दिली आहे.
याचाच अर्थ जर तुम्हाला ३६० डिग्रीत खेळणारा आपला स्काय- सूर्यकुमार यादवची फटकेबाजी पाहायची असेल किंवा सर्वांचा लाडका महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट वेगवेगळ्या अँगलने पाहायचा असेल तर टाटा आयपीएल जिओ सिनेमाच्या मल्टी कॅम मोडमध्येच बघावं लागेल. युजरला मल्टी कॅम मोडमध्ये अधिक प्रभावीपणे टाटा आयपीएलचा अनुभव घेता येत आहे.
४. बहू भाषिक समालोचन:
टाटा आयपीएलचा सर्वोत्तम अनुभव तो हि आपल्या आवडत्या भाषेत प्रेक्षकांना जिओ सिनेमामुळे घेता येत आहे. जिओ सिनेमावर एकूण १२ भाषेत टाटा आयपीएलचे समालोचन करण्यात येत आहे.
ज्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्ल्यालम आणि ओरिया या भाषेत सामनाच्या समालोचनासहित इनसाईडर फीड, हँगआऊट फीड, फँटसी फीड, फॅनझोन फीड यासह एकूण १६ फीड बहुभाषेत देण्यात येत आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे जिओ सिनेमावर क्रिकेटचे स्टार सुरेश रैना, क्रिस गेल, एबीडी, अनिल कुंबळे, रॉबिन उथप्पा, आरपी सिंग, जहीर खान, इऑन मॉर्गन, ग्रॅमी स्मिथ आणि स्कॉट स्टायरिस यासारखे दिग्गज खेळाडू जिओ सिनेमाच्या एक्सपर्ट पॅनेलवर आहेत.
५. मोफत प्रक्षेपण:
टाटा आयपीएलचे प्रक्षेपण जिओ सिनेमावर का पाहावं याच्या या काही कारणांच्या यादीत हे खास कारण खूप महत्वाचं आहे. जिओ सिनेमा कोणत्याही नेटवर्कवर मोफत वापरता येणार आहे. टाटा आयपीएलच्या मोफत प्रक्षेपणामुळे प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. मोफत 4K क्वालिटीमध्ये प्रक्षेपण उपलब्ध करून दिल्यामुळे जिओ सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.