Pat Cummins RCB : आयपीएल 2024 चा लिलाव संपून आता जवळपास आठवडा होत आला आहे. मात्र तरी देखील ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर लागलेली छप्पर फाड के बोलीवर चर्चा काही संपत नाहीये. भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने आता आरसीबीने एकाच खेळाडूवर एवढी मोठी बोली लावण्याचा प्रयत्न केल्याने टीका केली आहे. टीका करताना चोप्राने आरसीबीला चिमटा देखील काढला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सवर सनराईजर्स हैदराबादने 20.5 कोटी रूपयाला खरेदी केलं. आरसीबी यंदाच्या लिलावात 23.25 कोटी रूपये घेऊन उतरली होती. त्यांनी मुंबई इंडियन्सकडून कॅमरून ग्रीनला मोठी रक्कम देऊन ट्रेड केलं होते. तरी देखील कमिन्ससाठी आरसीबीने जोरदार प्रयत्न केले.
यावर आकाश चोप्राने आरसीबीला चिमटा काढला. तो म्हणाला की आरसीबी नशिबवान आहे की त्यांनी कमिन्सला खरेदी केलं नाही.
आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, 'त्यांनी पॅट कमिन्सला खरेदी करण्याचा चंगच बांधला होता. ते त्याच्यासाठी आक्रमकपणे बोली लावत होते. त्यांच पॅडल ते सतत उंचावत होते. ही बोली 20 कोटींपर्यंत गेली. मी हात जोडून म्हणत होतो की थोडा विचार करा जर तुम्ही कमिन्सला 20 कोटी रूपयाला खरेदी केलं असतं अन् तुमच्याकडे 23.25 कोटी रूपयेच होते. पॅट कमिन्स काय दोन्ही एन्डनी गोलंदाजी करणार होता का?
चोप्रा पुढे म्हणाला की, 'जर त्यांनी पॅट कमिन्सला खरेदी केलं असतं जर एसआरएचने माघार घेतली असती तर त्यांना कमिन्सला 20 कोटी रूपये देऊन खरेदी करावं लागलं असतं. त्यांचा संघ अत्यंत दुबळा झाला असता. ज्यावेळी तुम्ही खूप खेळाडू रिलीज केलेले असता आणि तुम्ही पॅट कमिन्सला खरेदी केलं तेही चिन्नास्वामी सारख्या पाटा खेळपट्टीवर, छोट्या मैदानावर! त्या मैदानावर खूप फटकेबाजी होते.
आरसीबीने हैदराबादचे आभार मानले पाहिजेत असं म्हणत चोप्राने अजून एक चिमटा काढला. तो म्हणाला, 'तुम्ही हैदराबादला मेरी ख्रिसमस आणि हॅप्पी न्यू इयरचं कार्ड पाठवायला हवं कारण तुम्हाला त्यांनी वाचवलं. त्यांनी शेवटपर्यंत बोली लावली आणि तुम्हाला वाचवलं. विशेष म्हणजे त्यांनी फक्त पॅट कमिन्सवरच बोली लावली. त्यांनी गेराल्ड कॉट्झी आणि मिचेल सँट्नरवर बोली लावली नाही.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.