Aaron Finch Says one Franchise T Shirt Missing  esakal
IPL

IPL 2022: फिंच म्हणाला माझा टी - शर्ट हरवला; काय आहे भानगड?

सकाळ डिजिटल टीम

यंदाच्या आयपीएल लिलावात (IPL 2022 Auction) ऑस्ट्रेलियाचा टी 20 वर्ल्डकप विजेता कर्णधार अ‍ॅरोन फिंच (Aaron Finch) अनसोल्ड राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) रिप्लेसमेंट म्हणून का असेना फिंचवर दया दाखवत त्याला बेस प्राईसला खरेदी केले. मात्र केकेआरच्या या एका निर्णयामुळे फिंचने एक निराळा विक्रम केला. फिंच आता 9 संघाकडून आयपीएल खेळणारा खेळाडू ठरला आहे. (Aaron Finch Played For 9 IPL Teams)

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फिंचला एका मुलाखतीदरम्यान तू खेळलेल्या 9 आयपीएल फ्रेंचायजींचे टी शर्ट तुझ्याकडे आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्याने 'हा चांगला प्रश्न आहे. एका फ्रेंचायजीचा टी शर्ट मिसिंग आहे. ती कोणती फ्रेंचायजी आहे हे मला आता आठवत नाही.' असे उत्तर दिले.

दरम्यान, फिंचने 2022 च्या आयपीएल हंगामात केकेआर सोबत जोडले जाण्याबाबत एक रंजक गोष्ट सांगितली. अ‍ॅरोन फिंचने केकेआरचा प्रशिक्षक ब्रॅडन मॅक्युलमला 2022 च्या हंगामात आपल्या उपलब्धतेबाबत पत्र लिहिले होते. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला याबाबत सांगितले. हा किस्सा सांगताना फिंच म्हणतो, 'मी माझ्या पत्नीसोबत रात्रीचे जेवण घेत होतो. त्याचवेळी आधी मी मॅक्युलमला माझा निर्णय कळवला आणि मग एमीला याबाबत कल्पना दिली. खरं म्हणजे ज्या ज्या वेळी मी एखाद्या सुट्टीचा प्लॅन करतो त्या त्यावेळी काही ना काही आडवे येतेच. गेल्या सहा वर्षात असंच झालं आहे. यातील दोन वर्षे तर कोरोनाने वाया गेलीत. आम्ही सुट्टीचा प्लॅन करतो आणि शेवटच्या मिनिटाला काहीतरी घडतेच. माझी पत्नी समजूदार आहे त्यामुळे तिला आश्चर्याचा धक्का बसला नाही. ती आणि माझी मुलगी काही काळांनी भारतात येतील.'

आयपीएलचा 15 वा हंगामात 26 मार्चपासून सुरू होत आहे. पहिलाच सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT