Abhishek Sharma Miss Fastest Half Century Of IPL History  esakal
IPL

Abhishek Sharma DC vs SRH : कमनशिबी अभिषेक शर्मा! युवराजचा पठ्ठ्या IPL मध्ये मोठा इतिहास रचण्यापासून मुकला

अनिरुद्ध संकपाळ

Abhishek Sharma DC vs SRH IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध सनराईजर्स हैदराबाद सामन्यात हैदराबादनं पहिल्या 6 षटकातच 125 धावा ठोकल्या. ट्रॅविस हेडनं 16 चेंडूत अर्धशतक ठोकलं तर अभिषेक शर्मानं 10 चेंडूतच 40 धावा ठोकल्या होत्या. मात्र तो 12 चेंडूत 46 धावा करून कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचं आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.

अभिषेक शर्माला आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याची सुवर्ण संधी होती. यशस्वी जयस्वालनं 13 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्याचा विक्रम मोडण्यासाठी अभिषेक शर्माला पुढच्या 2 चेंडूत 10 धावा करण्याची गरज होती. त्यानं षटकार मारला अन् तो विक्रम मोडण्याच्या जवळ पोहचला. मात्र 12 व्या चेंडूवर त्याला कुलदीप यादवनं बाद केलं अन् युवराज सिंगचा पठ्ठ्या पुन्हा एकदा मोठा विक्रम करण्यापासून वंचित राहिला.

अभिषेक शर्मानं 12 चेंडूत 46 धावा चोपल्या. त्यानं ही खेळी 6 षटकार आणि 2 चौकारांनी सजवली. त्यानं 383.33 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याचा सलमीवीर साथीदार ट्रॅविस हेडने 32 चेंडूत 89 धावा केल्या. तो देखील युसूफ पठाणचे आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या विक्रम मोडण्यापासून फार लांब नव्हता. मात्र कुलदीपनं त्याचीही शिकार करत त्याचाही स्वप्न भंग केला.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT