आयपीएलचा मेगा लिलाव येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होत आहे. यंदाच्या लिलावात सगळ्याच संघांना संपूर्ण संघबांधणी करण्याची संधी आहे. अनेक संघांना तर त्यांचा नवा कर्णधारही शोधावा लागणार आहे. यात सर्वात वरचा क्रमांक लागतो तो रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore). विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर काही दिवसातच आरसीबीचे (RCB) कर्णधारपदही सोडले होते. त्यामुळे आता आरसीबीला संघ निवडीबरोबरच आपला नवा कर्णधारही निवडावा लागणार आले. दरम्यान, भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरने (Ajit Agarkar) आरसीबी लिलावाच्या वेळी कोठे चुका करते याबाबत आपले मत व्यक्त केले. याचबरोबर कर्णधार निवडीबाबतही त्याने एक सल्ला दिलाय.
अजित आगरकरने स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लॅन आयपीएल लिलाव विशेष या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 'जर विराट कोहली पुन्हा कॅप्टन्सी आपल्या हातात घेतो. तसं तो आनंदानं करत असेल आणि त्याच्याकडे तेवढी एनर्जी असेल तर आरसीबीसाठी (RCB) हा सर्वात सोपा उपाय असेल. गेल्या काही वर्षात आपण आरसीबीने 13 ते 14 जणांची व्यवस्थित संघ बांधणी करण्यात पैसा गुंतवलाच नाही.'
अजित आगरकरने सांगितले की कोणीही तुम्हाला एकाच खेळाडूवर मोठा पैसा खर्च करण्याचा सल्ला देत नाही. आगरकर म्हणतो की, 'आरसीबी ही कायमच टॉप तीन फलंदाजांवर अवलंबून राहिली आहे. चांगली मधली फळी नाही. जर तुमच्याकडे पैसाच नसेल तर तुम्ही पुन्हा मधली फळी मजबूत करू शकणार नाही. जर तुम्ही तुमचा सगळा पैसा एकाच खेळाडूवर खर्च केला तर तो कितीही चांगला असला ती तो तुम्हाला सामने जिंकून देऊ शकतो मात्र आयपीएल नाही.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.