Anil Kumble Ambati Rayudu esakal
IPL

Anil Kumble Ambati Rayudu : ती तर मोठी चूक... रायुडूने निवृत्ती घेताच कुंबळेने जखमेवर चोळले मीठ

अनिरुद्ध संकपाळ

Anil Kumble Ambati Rayudu : आयपीएलच्या 16 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू फारसा चालला नाही. मात्र गुजरात विरूद्धच्या अंतिम सामन्यात त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे त्याने या सामन्यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली होती. चेन्नईने 171 धावांचे टार्गेट 15 षटकात पार केले होते. या चेसदरम्यान रायुडूने 8 चेंडूत 19 धावा केल्या.

दरम्यान, अंबाती रायुडूने निवृत्तीची घोषणा करताच भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी रायुडूला 2019 च्या वनडे वर्ल्डकप संघातून वगळणे चुकीचे होते असे म्हणत जुन्या कढीला नव्याने ऊत आणला. कुंबळे म्हणाला की, वादग्रस्तरित्या वर्ल्डकप संघातून वगळण्यात आल्यानंतर चार वर्षांनी रायुडूने आपली कारकिर्द संपवली. हा निर्णय खूप मोठी चूक होती असे मत अनिल कुंबळेंनी व्यक्त केले.

माजी प्रशिक्षकाच्या या वक्तव्यामुळे त्यावेळचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहते. रवी शास्त्री आणि विराट हे देखील या निर्णयात सामिल होते. त्यांनी रायुडूला एका विशिष्ट भुमिकेसाठी सहा महिन्यापासून तयार केले अन् अचानक त्याला संघातून डच्चू देण्यात आला.

अनिल कुंबळे म्हणाला की, 'रायुडू 2019 चा वर्ल्डकप खेळायला हवा होता. याबाबत कोणतीही शंका नाही. ती खूप मोठी चूक होती. तुम्ही त्याला दीर्घकाळ एक जबाबदारी दिली अन् अचानक त्याचे नाव संघातून गायब झाले. हे खूप आश्चर्यकारक होते.' कुंबळेने हे वक्तव्य जिओ सिनेमावर आयपीएल फायनलच्यावेळी केले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT