Anukul Roy Almost Loses Pants sakal
IPL

Oops! रन वाचवायला गेला पण पँट सुटली; IPL सामन्यातला VIDEO व्हायरल

रॉयने ऍथलेटिक डायव्ह टाकून आपल्या संघाची 2 धाव यशस्वीपणे वाचवल्या मात्र...

Kiran Mahanavar

Anukul Roy IPL 2022: आयपीएलच्या चालू हंगामात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. अनुकुल रॉय, शिवम मावी यांनी अनुक्रमे व्यंकटेश अय्यर आणि हर्षित राणा यांची जागा घेतली. यूपीत जन्मलेला फिरकीपटू अनुकुल रॉय याला 3 वर्षांच्या कालावधीनंतर आयपीएल खेळण्याची संधी मिळाली होती. अनुकुल रॉय हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे जो मैदानात खूप उत्साही असतो. आजच्या सामन्यात एक धाव वाचवताना तो एका अशा क्षणाचा बळी ठरला जो कुणालाही आवडत नाही. धाव वाचवण्यासाठी उडी मारली, आणि त्याची पॅंट खाली आली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होते आहे.(Anukul Roy Almost Loses Pants)

राजस्थान रॉयल्सची बॅटिंग सुरू असताना सुनिल नारायण (Sunil Narine) टाकत असलेला 8व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बॉल जॉस बटलरने (Jos Buttler) स्वीप शॉट खेळला, रॉयने ऍथलेटिक डायव्ह टाकून आपल्या संघाची 2 धाव यशस्वीपणे वाचवल्या. मात्र, हे करत असताना अनुकुलची पॅंट खाली आले. अनुकुल रॉयच्या या प्रयत्नाचे केकेआर संघातील सहकाऱ्यांनी कौतुक केले.

राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर चांगली सुरुवात झाली नाही. देवदत्त पडिक्कलची लवकर विकेट गमावली. जोस बटलरनेही वेळेसाठी संघर्ष केला आणि 25 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. सॅमसनने 54 धावांची संयमी खेळी खेळली पण शेवटी त्याला वेग वाढवता आला नाही. ज्यामुळे राजस्थान 153 धावां करू शकले. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली नाही. अॅरॉन फिंच 4 आणि बाबा इंद्रजीत 15 धावा करून बाद झाले. चौथ्या विकेटसाठी राणाने 48 आणि रिंकूने 42 धावांची नाबाद खेळी करून विजय मिळवून दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT