arjun-tendulkar-comeback-in-mumbai-indians-playing-11-mi-vs-srh-ipl-2023  
IPL

IPL 2023 MI vs SRH: अर्जुन तेंडुलकर महिनाभरानंतर संघात परतणार! कर्णधार रोहितची मोठी खेळी

Kiran Mahanavar

IPL 2023 MI vs SRH Arjun Tendulkar : आयपीएल 2023च्या 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून हैदराबादचा संघ आधीच बाहेर पडला आहे. दुसरीकडे मुंबईच्या दृष्टिकोनातून हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ मोसमातील शेवटचा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर वानखेडेवर खेळणार असून या सामन्यात संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागेल आणि हा विजयही मोठा असायला हवा. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा मोठी खेळी करू शकतो. सुमारे महिनाभरानंतर तो अर्जुन तेंडुलकरला संघात परत घेऊ शकतो.

अर्जुन तेंडुलकरने 16 एप्रिल रोजी KKR विरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. यानंतर त्याने 25 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला. त्याने पहिल्या सामन्यात दोन षटकांत ऋद्धिमन साहाची विकेट घेतली. पण त्यानंतर कर्णधाराने त्याला ओव्हर दिला नाही. यानंतर लखनौविरुद्धच्या शेवटच्या सामन्यापूर्वी त्याच्या गोलंदाजीच्या हाताला कुत्र्याने चावा घेतल्याचे समोर आले होते. दरम्यान अर्शद खान, आकाश मधवाल हे खेळाडूही पुढे आले. हे दोन्ही खेळाडू विशेष छाप पाडू शकले नाहीत.

दुसरीकडे, अर्जुन तेंडुलकरने खेळलेल्या चारही सामन्यांमध्ये त्याने 31 धावांचे एक षटक टाकले होते, त्याशिवाय सुरुवातीच्या षटकांमध्ये तो सातत्याने किफायतशीर होता. सनरायझर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अर्जुनने आयपीएलची पहिली विकेट घेतली आणि शेवटचे षटक टाकून मुंबईला विजय मिळवून दिला.

आता प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा संघात पुनरागमन करू शकतो. अर्जुनने चार सामन्यांत 3 बळी घेतले. दुसरीकडे अर्शदने 6 सामन्यात 13.4 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली आणि पाच विकेट घेतल्या. आकाश मधवालनेही 5 सामन्यात चार विकेट घेतल्या आणि त्याची इकॉनॉमीही 9 च्या आसपास होती.

  • मुंबई इंडियन्सचे प्लेइंग 11

    रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, कॅमेरॉन ग्रीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरेनडॉर्फ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT