Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 च्या यजमानपदावरून बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद सुरूच आहे. आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी पाकिस्तानकडे असली, तरी सध्या जे काही सुरू आहे, ते पाहता आशिया चषक पाकिस्तानात होईल, असे वाटत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडिया पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे, तेव्हापासून हे प्रकरण अडकले आहे.
यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीला आणखी एक धक्का बसला आहे. आतापर्यंत फक्त भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता, मात्र आता आणखी दोन देश त्यात सामील झाले आहेत. अशा स्थितीत आशिया चषक पाकिस्तानच्या हातून बाहेर होण्याची शक्यता वर्तवली जात असून आणखी काही करण्याच्या रणनीतीवरही विचार केला जात आहे.
आशिया कप 2023 सप्टेंबरमध्ये होणार आहे. याचे आयोजन पाकिस्तानने केले आहे, परंतु BCCI चे सचिव आणि ACC चे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाऊ शकत नाही हे फार पूर्वीच स्पष्ट केले आहे. यामागे भारत आणि पाकिस्तानमधील परस्पर संबंध आणि टीम इंडियाची सुरक्षा हे एक मोठे कारण आहे.
आशिया कपच्या मुद्द्यावर श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला पाठिंबा दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी हायब्रीड मॉडेल सुचवले होते, मात्र आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला दिलेला पाठिंबा हा पीसीबीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानी वाहिनी जिओ स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, जर आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केला गेला नाही तर बांगलादेश व्यतिरिक्त श्रीलंका ही स्पर्धा आयोजित करण्यास तयार आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक देखील याच वर्षी होणार आहे, ज्याचे आयोजन भारत करत आहे. बीसीसीआय आपले संपूर्ण वेळापत्रक निश्चित करण्यात व्यस्त आहे. दरम्यान, अशीही बातमी येत आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डला (PCB) बीसीसीआयने लेखी आश्वासन द्यावे की, 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे, ज्यामध्ये टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार आहे. मात्र बीसीसीआयकडून याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
एसीसीच्या पुढील बैठकीत बीसीसीआयकडून आशिया चषक पाकिस्तानव्यतिरिक्त अन्य देशात आयोजित करण्याबाबत कठोर भूमिका घेतली जाईल, असे मानले जात आहे. असे वृत्त आहे की बीसीसीआय पीसीबीचा प्रस्ताव देखील नाकारू शकते, ज्यामध्ये पीसीबीने असे म्हटले आहे की आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने अन्य कोणत्या तरी देशात व्हावेत आणि उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये व्हावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.