RR vs LSG : राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात लखनौने 155 धावांचे माफक आव्हान देखील डिफेंड कर राजस्थानला 10 धावांनी मात दिली. राजस्थानला 20 षटकात 6 बाद 144 धावाच करता आल्या. राजस्थानने चांगली सुरूवात करून देखील त्यांच्या मधल्या टप्प्यात विकेट पडल्याने धावगती मंदावली. लखनौकडून आवेश खानने 2 तर स्टॉयनिसने 2 विकेट्स घेतल्या. राजस्थानकडून यशस्वी जैसवालने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर बटलरने 40 धावांची खेळी केली मात्र त्याला यासाठी 41 चेंडू खेळावे लागले.
जरी आज दुसऱ्या स्थानावर असलेल्या लखनौने अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थानचा पराभव करत 8 गुण मिळवले असले तरी राजस्थानच्या अव्वल स्थानाला ते काही धक्का लावू शकले नाहीत. कारण राजस्थानचे नेट रनरेट +1.043 आहे तर लखनौचे नेट रनरेट हे +0.709 इतके आहे.
लखनौ सुपर जायंट्सने ठेवलेल्या 155 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामी जोडीने दमदार सलामी दिली. यशस्वी जैसवाल आणि जॉस बटलर यांनी पहिल्या 8 षटकात 60 धावा केल्या.
चांगल्या सुरूवातीनंतर मात्र राजस्थानची धावगती मंदावण्या सुरूवात झाली. आधी यशस्वी जैसवाल 35 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्याला त्यानंतर संजू सॅमसनला फक्त 2 धावांची भर घालता आली. दरम्यान, स्टॉयनिसने संथ खेळणाऱ्या बटलरला 40 धावांवर बाद करत राजस्थानला धक्का दिला. आनेश खानने शिमरॉन हेटमायरला 2 धावांवर बाद करत राजस्थानला जबर धक्का दिला.
राजस्थानच्या पाठोपाठ विकेट पडल्याने त्यांची धावगती मंदावली. अखेर सामना शेवटच्या षटकात 19 धावा असा आला होता. आवेश खानच्या या षटकात पहिल्याच चेंडूवर रियान परागने चौकार लगावत आशा निर्माण केली होती. मात्र यानंतर आवेशने 8 धावा देत 2 विकेट्स घेत लखनौला सामना 10 धावांनी जिंकून दिला.
त्याने 26 धावा करणाऱ्या पडिक्कल आणि ध्रुव जुरेल (0) यांना बाद केले. पराग 15 धावा करून नाबाद राहिला. लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने 28 धावात 2 बळी टिपले.
तत्पर्वी, केएल राहुल - मेयर्स या सलामी जोडीने 82 धावांची सलामी दिल्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करत लखनौला 155 धावांपर्यंत रोखले. मेयर्सने 51 तर राहुलने 39 धावांचे खेळी केली. मात्र त्यानंतर अश्विन, बोल्ट, होल्डर संदीप शर्मा यांनी चांगला मारा करत लखनौला 20 षटकात 6 बाद 154 धावात रोखले.
हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.