IPL 2024 RCB sakal
IPL

IPL 2024 RCB : बंगळूरला सलग चौथ्या विजयाची आशा ; पंजाब किंग्सशी आज लढणार, प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची अंधूक संधी

सकाळ वृत्तसेवा

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व पंजाब किंग्स यांच्यामध्ये उद्या (ता. ९) आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. दोन्ही संघांनी अकरा सामन्यांमधून चार सामन्यांमध्ये विजय संपादन केले आहेत. सात सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघांचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर आहे. मात्र, अंधुकशी आशा करायला हरकत नाही. यासाठी मात्र दोन्ही संघांना उर्वरित तीनही लढती जिंकाव्या लागणार आहे. बंगळूरचा संघ सलग चौथ्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.

बंगळूर संघाने मागील तीन लढतींमध्ये विजय संपादन केले आहेत. त्यामुळे सध्याचा फॉर्म बघता पंजाबविरुद्धच्या लढतीत बंगळूरचे पारडे जड आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. विराट कोहलीने अकरा सामन्यांमधून चार अर्धशतके व एक शतकासह ५४२ धावा फटकावल्या आहेत. विल जॅक्स व कॅमेरून ग्रीन या परदेशी खेळाडूंनी गेल्या काही सामन्यांमध्ये चमक दाखवली आहे. त्यामुळे विराटसह जॅक्स, ग्रीन यांच्याकडूनही बंगळूरला आशा करता येणार आहे. कर्णधार फाफ ड्युप्लेसीचे अपयश बोचणी देणारे ठरत आहे.

बंगळूर संघाला गोलंदाजी विभागात सपाटून मार खावा लागत आहे. मोहम्मद सिराजला आतापर्यंत सूर गवसलेला नाही; पण टी-२० विश्‍वकरंडकाच्या पार्श्वभूमीवर त्याने फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे. उर्वरित तीनही लढतींमध्ये त्याला गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. यश दयाल व विजय वैशाख यांच्याकडून बंगळूरला अपेक्षा आहेत.

दोनपैकी एकाच संघाला १४ गुण कमवता येणार

बंगळूर व पंजाब या दोन्ही संघांनी चार विजयांसह प्रत्येकी आठ गुणांची कमाई केली आहे. आता दोन्ही संघांच्या तीन लढती शिल्लक आहेत. या तीनही लढतींमध्ये विजय मिळवल्यास १४ गुण कमावता येणार आहेत; पण या दोनपैकी एकाच संघाला १४ गुणांची कमाई करता येणार आहे. कारण तीनपैकी एका लढतीतील पराभवानंतर त्या संघाला १४ गुण कमवता येणार आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची अंधूक आशाही त्या संघाला करता येणार नाही. १४ गुण कमवल्यानंतरही त्या संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे, हे विशेष.

घरच्या मैदानावर पराभवाचे शल्य

कर्णधार शिखर धवन याला दुखापत झाल्याचा फटका पंजाब किंग्सला बसला आहे. घरच्या मैदानावरही या संघाला सातत्याने निराशेला सामोरे जावे लागत आहे. मुल्लानपूर हे पंजाबचे होम ग्राऊंड; पण येथे झालेल्या पाचपैकी चार लढतींमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच धरमशाला येथेही त्यांच्याकडून निराशा झाली. आता उद्याही धरमशाला येथेच लढत रंगणार आहे. घरच्या मैदानावर ही त्यांची अखेरची लढत आहे. शेवट गोड करण्यासाठी पंजाबचा संघ प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT