IPL 2024 and Lok Sabha election Marathi News sakal
IPL

IPL 2024-Lok Sabha : रणधुमाळी आणि ‘रन’संग्राम एकाच वेळी! लोकसभा निवडणुकांमुळे IPL शेड्यूलवर BCCIला पुन्हा करावी कसरत

IPL 2024 and Lok Sabha election : आयपीएलचे हे १७ वे वर्ष आहे आणि २००९ पासून दर पाच वर्षांनी देशात लोकसभा निवडणुका असताना आयपीएलला तारेवरची कसरत करायला लागत आहे.

Kiran Mahanavar

IPL 2024 and Lok Sabha election : आयपीएलचे हे १७ वे वर्ष आहे आणि २००९ पासून दर पाच वर्षांनी देशात लोकसभा निवडणुका असताना आयपीएलला तारेवरची कसरत करायला लागत आहे. यंदाची आयपीएलही अपवाद नाही. एकीकडे लोकसभा प्रचार आणि मतदान यांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे धावांची ‘रन’धुमाळी रंगणार आहे; परंतु आयपीएल सामन्यांचा कार्यक्रम तयार करणे बीसीसीआयसाठी जिकिरीचे असणार आहे.

आयपीएलचा मोसम साधारणतः एप्रिल-मे महिन्यात होत असतो आणि लोकसभा निवडणुकीचाही कालावधी एप्रिल-मे महिन्यांचाच असतो, त्यामुळे एकाच वेळी निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना क्रिकेटचा ‘रन’संग्राम याचा मेळ बसवणे कठीण जात असते. २००८ मध्ये आयपीएलचे पहिले पर्व झाले आणि पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या. आयपीएल अजूनही रुजलेली नसल्यामुळे ही संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती.

सरकारची मान्यता महत्त्वाची

बीसीसीसाय ही स्वतंत्र अस्तित्व असलेली संस्था आहे. केंद्र सरकारकडून कोणतेही अनुदान किंवा आर्थिक मदत घेतली जात नाही. स्वतः एक क्रिकेट विश्वातील सर्वाधिक श्रीमंत संघटना असली तरी सरकारच्या मान्यतेशिवाय काहीच करता येत नाही, हे सत्य आहे.

काय आहेत अडचणी?

लोकसभा निवडणुका आणि आयपीएल एकाच वेळी असली की प्रामुख्याने सुरक्षिततेचा प्रश्न फार महत्त्वाचा असतो. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांचा मोठा फौजफाटा दोन्हीकडे लागतो, त्यामुळे निवडणुकांच्या वेळी आयपीएलचे सामने खेळविणे सोपे जात नाही.

उदा. मुंबईत सामना असला आणि त्याचवेळी विविध पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या सभा असल्या की, सभास्थानी आणि स्टेडियम या दोन्हींकडे सुरक्षा यंत्रणा तयार करणे कठीण असते. शेवटी दोन्हींकडची सुरक्षा तेवढीच महत्त्वाची ठरते. त्यातच मतदान ज्या शहरात असेल त्याच्या काही दिवस अगोदर तरी त्या ठिकाणी सामने खेळवता येत नाही. हा सर्व विचार करून वेळापत्रकाची आखणी करावी लागते.

आयपीएल ही सर्वांसाठी व्यवसायाचा स्राेत आहे. त्यामुळे परदेशात आयपीएल खेळवायची तर त्या देशाला मोठ्या प्रमाणात निधी द्यावा लागतो. आपल्याकडे स्पर्धा झाली की सामन्यांच्या तिकिटांचेही उप्तन्न मिळत असते.

आयपीएल आणि निवडणुका

२००९ : वर्षी यूपीएचे सरकार होते. आयपीएल आयुक्त असलेले ललित मोदी पूर्ण फॉर्मात होते; परंतु तेही यावेळच्या लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएल भारतात खेळवू शकले नाहीत. अखेर त्यांना दक्षिण आफ्रिकेचा रस्ता धरावा लागला; परंतु आफ्रिकेत आयपीएल खेळवण्यासाठी त्यांना अतिरिक्त निधी द्यावा लागला, यावरून बराच वाद झाला होता. दक्षिण आफ्रिका मंडळाच्या तत्कालीन अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचाही आरोप करण्यात आला होता.

२०१४ : या वर्षीही यूपीएचे सरकार होते. यावेळीही आयपीएल सामन्यांना सुरक्षा पुरवण्यास नकार देण्यात आल्यामुळे आयपीएलचा पहिला टप्पा अमिरातीमध्ये खेळवण्यात आला. १६ एप्रिलपासून पहिले २० सामने तेथे झाले आणि २ मे पासून उर्वरित सामने भारतात खेळवण्यात आले.

२०१९ : यावेळी एनडीएचे सरकार होते आणि लोकसभा निवडणुका होत असतानाही पूर्ण आयपीएल भारतात खेळवण्यात आली; परंतु सामन्यांचा कार्यक्रम तयार करताना फार मोठी कसरत करावी लागली होती. प्रचार सभा आणि मतदानाच्या तारखा वगळून सामने खेळवण्याचा मेळ बांधणे कठीण गेले होते.

२०२४ : या वेळीही एनडीएचे सरकार आहे. आणि आताही लोकसभा निवडणुका आहेत; परंतु हा कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर आयपीएलने पहिल्या २० दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लवकरच उर्वरित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्ण आयपीएल भारतातच होईल, असेही आश्वासन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates: देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT