BCCI officially declares Rishabh Pant fit Mohammed Shami and Prasidh Krishna ruled out IPL 2024  sakal
IPL

IPL आधी BCCI ची मोठी घोषणा! दोन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, ऋषभ पंतचं काय झालं?

आयपीएल 2024 सुरू होण्यापुर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंच्या फिटनेसबाबत मोठी घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. तर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे.

Kiran Mahanavar

IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्यापुर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंच्या फिटनेसबाबत मोठी घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. तर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या तंदुरुस्त घोषित केले आहे. मंडळाने मंगळवारी ही माहिती दिली. याआधी सोमवारी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडू तंदुरुस्त असल्याचे सांगितले होते.

बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात असेही म्हटले आहे की, गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि राजस्थान रॉयल्सचा प्रसिद्ध कृष्णा या हंगामातील टी-20 लीगमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत.

1. ऋषभ पंत (Rishabh Pant Fitness Update)

बीसीसीआयने पंतला तंदुरुस्त घोषित करताना म्हटले की, "30 डिसेंबर 2022 रोजी उत्तराखंडच्या रुरकीजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातानंतर 14 महिन्यांच्या पुनर्वसनानंतर, ऋषभ पंतला आता आगामी आयपीएलसाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे."

2. प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna Ruled Out of IPL 2024)

त्याचवेळी, बोर्डाने आणखी दोन खेळाडूंबाबत अपडेट्सही दिले आहेत. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाबाबत बोर्डाने सांगितले की, "23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिध कृष्णावर डाव्या बाजूच्या क्वाड्रिसेप्स टेंडनवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. लवकरच तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये सामील होईल. त्यामुळे आगामी टाटा आयपीएल 2024 मध्ये तो सहभागी होऊ शकणार नाही."

3. मोहम्मद शमी (Mohammed Shami Ruled Out Of IPL 2024)

याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही आयपीएल 2024 मधून वगळण्यात आले आहे. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. "वेगवान गोलंदाजावर 26 फेब्रुवारी 2024 रोजी त्याच्या उजव्या टाचेच्या समस्येवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याच्यावर BCCI वैद्यकीय पथकाकडून देखरेख केली जात आहे आणि आगामी टाटा IPL 2024 मधून त्याला वगळण्यात आले आहे," असे बोर्डाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT