Asia Cup 2023 Jay Shah : आशिया कप एका देशात आयोजित करायचा की दोन देशात याबाबतचा निर्णय हा आयपीएलनंतर घेण्यात येणार आहे. आयपीएल 2023 ची फायनल पाहण्यासाठी एशियन क्रिकेट काऊन्सिलचे पदाधिकारी हजर राहणार आहेत. यावेळी आशिया कपच्या आयोजनाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती जय शहा यांनी आज दिली.
जय शहा हे पीटीआयशी बोलताना म्हणाले की, 'सध्याच्या घडीला तरी आशिया कपच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. आम्ही सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहोत. मात्र श्रीलंका क्रिकेट, बांगलादेश आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी येणार आहेत. आम्ही यावेळी चर्चा करू आणि त्यावर अंतिम निर्णय घेऊ.'
यंदाच्या आशिया कपचे यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने याबाबतची परवानगी दिलेली नाही. यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप आणि धमक्यांनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन नजम सेठी यांनी एक हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. यामुळे आशिया कप त्यांच्या देशात देखील आयोजित केला जाऊ शकले.
आशिया क्रिकेट काऊन्सिलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेठी यांनी सादर केलेल्या हायब्रीड मॉडेलनुसार श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान त्यांचे पहिले चार सामने हे पाकिस्तानमध्ये खेळतील त्यानंतर भारतासोबत ते त्रयस्थ ठिकाणी ते आपले सामने खेळतील. गेल्या काही महिन्यापूसन आशिया कप आयोजनावरून भारत - पाकिस्तान यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यावर हा चांगला पर्याय असल्याचे दिसून येत आहे. मात्र यावर अजून आशिया क्रिकेट काऊन्सिलकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. आशिया कप हा 1 ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.