BCCI to Meet IPL Owners at July End sakal
IPL

IPL 2025 मध्ये कोहली-पांड्याचा पगार वाढणार? BCCI आणि IPL मालकांची बैठक

Kiran Mahanavar

BCCI to Meet IPL Owners at July End : आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्यास अजून काही महिने बाकी आहेत, पण त्याआधीच याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे यावेळी होत असलेला मेगा लिलाव. या मेगा लिलावासाठी बराच वेळ असला तरी तो साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होतो, पण त्याबाबत चर्चा सुरू झाला आहे.

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, एमएस धोनी, ऋषभ पंत यांसारख्या स्टार्सचे पुढच्या हंगामात काय होणार यांच्या बद्दलच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आणि ठेवलं तरी लिलावात खेळाडूंचा पगार किती असेल? यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जुलैच्या अखेरीस संघ मालकांसोबत एक बैठक बोलावली आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने सर्व फ्रँचायझी मालकांना 30-31 जुलै रोजी बैठकीसाठी बोलावले आहे. मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन हंगामापूर्वी मेगा लिलावाच्या नियमांवर चर्चा होणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिटेन्शन. लिलावापूर्वी फ्रँचायझी किती खेळाडूंना कायम ठेवू शकेल. गेल्या अनेक वर्षांपासून मेगा लिलावासाठी हा आकडा केवळ 4 होता, तो आता बदलण्याची मागणी होत आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या काही आठवड्यांत बीसीसीआयने फ्रँचायझी मालकांना या संदर्भात त्यांचे मत विचारले आहे आणि त्यांना वेगवेगळी उत्तरे मिळाली आहेत. अधिकाधिक खेळाडूंना कायम ठेवून फ्रँचायझीची ओळख आणि चाहते टिकवून ठेवता यावेत यासाठी रिटेन्शनची संख्या 4 वरून 8 करावी, असे बहुतांश फ्रँचायझींचे मत आहे. तर काहीजणांना ते पटत नाहीत

इतकंच नाही तर दरवर्षीप्रमाणे यंदाही पगाराच्या रकमेत (ऑक्शन पर्स) वाढ झाली तर अनेक खेळाडूंच्या कमाईत वाढ होणार आहे. प्रत्येक फ्रँचायझीसाठी एक निश्चित लिलाव पर्स आहे, ज्या अंतर्गत त्यांना खेळाडू राखून ठेवावे लागतात आणि नंतर खेळाडू खरेदी करावे लागतात. मागील लिलावादरम्यान ही लिलाव पर्स 100 कोटी रुपये होती. यावेळी ते 120 कोटी रुपयांपर्यंत वाढवले ​​जाऊ शकते, असे मानले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT