Heinrich Klaasen Fined Marathi News 
IPL

IPL 2023 : संघासाठी सर्वाधिक धावा करूनही पंचाशी पंगा घेणं भोवले: BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

एक चुकीचे कृत्य अन् बीसीसीआयने केली कारवाई

Kiran Mahanavar

IPL 2023 Heinrich Klaasen Fined : आयपीएल 2023 च्या 58 व्या सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याच खेळल्या गेला. लखनऊविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा प्रचंड गदारोळ झाला. या सामन्यात प्रेक्षकांमधून कोहली... कोहलीच्या घोषणा ऐकू येत होत्या. त्याचवेळी लखनऊच्या डगआऊटवर लोकांकडून काहीतरी फेकले गेले, त्यामुळे सामना थांबवण्यात आला.

त्याचवेळी पंचांच्या निर्णयावरून बराच वाद झाला. तिसऱ्या पंचालाही नो बॉल आणि वाईड बॉलने घेरले होते. यावर मैदानावर उपस्थित खेळाडूंनी विरोधही केला. ज्याचा फटका आता हैदराबादच्या खेळाडूला सहन करावा लागत आहे.

सनरायझर्स हैदराबादसाठी या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या हेनरिक क्लासेनलाही सामन्यादरम्यान त्याच्या एका कृतीमुळे नुकसान सहन करावे लागले. नो बॉल देण्याच्या पंचांच्या निर्णयाला त्याने विरोध केला. त्यानंतर तो आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला. या अंतर्गत सार्वजनिक टीका, अयोग्य कमेंट यासारख्या गोष्टी आहेत. त्याने संघासाठी सर्वाधिक 47 धावांची उपयुक्त खेळी खेळली.

हेनरिक क्लासेनला त्याच्या चुकीची किंमत चुकवावी लागली आहे. आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर त्याला बीसीसीआयने मोठी शिक्षा दिली आहे. त्याला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या हंगामात आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने आवेश खानवर हेल्मेट फेकणे, विराट कोहली आणि नवीन-उल-हकची भांडणे अशा अनेक मुद्द्यांवर बीसीसीआयने कारवाई केली आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, लखनऊ सुपर जायंट्सने हैदराबादच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतला आणि सात गडी राखून शानदार विजय नोंदवला. निकोलस पूरनची 13 चेंडूत 44 धावांची खेळी या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. या पराभवानंतर सनरायझर्ससाठी प्लेऑफचा रस्ता जवळपास अशक्य झाला आहे. दुसरीकडे लखनऊने या विजयासह अंतिम-4 साठी जोरदार दावा मांडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT