Border-Gavaskar Trophy India A vs Australia A to play two first-class matches  sakal
IPL

Aus vs Ind : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी बोर्डाची मोठी घोषणा! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया 'या' तारखेला खेळणार २ सामने

Border-Gavaskar Trophy India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक दिवस-रात्र कसोटी सामनाही होणार आहे.

Kiran Mahanavar

Border-Gavaskar Trophy India vs Australia : टीम इंडियाला या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले आहे. मात्र या मालिकेतील पहिले दोन महत्त्वाचे सामने होणार असून, त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ यांच्यात दोन सामन्यांची चार दिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान मॅके येथील ग्रेट बॅरियर रीफ एरिना येथे खेळवला जाईल.

तर दुसरा सामना एमसीजीमध्ये 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यानंतर, पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या मुख्य संघातील खेळाडू आणि अ संघाच्या खेळाडूंमध्ये इंट्रा स्क्वॉड सामना होईल. हा सामना 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान वाका येथे खेळवला जाईल.

टीम इंडियाने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मागील दौऱ्यावर कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दोन सराव सामनेही खेळले होते. त्यानंतर भारताने ती मालिका 2-1 ने जिंकली. दुसरीकडे, भारतीय महिला संघ डिसेंबरच्या सुरुवातीला तीन एकदिवसीय सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे, जो ॲडलेडमध्ये पुरुषांच्या दुसऱ्या कसोटीच्या आसपास खेळवला जाईल.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कधी सुरू होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक दिवस-रात्र कसोटी सामनाही होणार आहे. पहिला कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पर्थ येथे होणार आहे. दुसरा सामना ॲडलेडमध्ये 6 ते 10 डिसेंबर दरम्यान होणार आहे, जो दिवस-रात्र कसोटी सामना असेल. तिसरा कसोटी सामना गाब्बा येथे, चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे आणि पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक :

  • पहिली कसोटी - 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ

  • दुसरी कसोटी - 6 ते 10 डिसेंबर, ॲडलेड

  • तिसरी कसोटी – 14 ते 18 डिसेंबर, ब्रिस्बेन; गाबा

  • चौथी कसोटी - 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न

  • पाचवी कसोटी – 3 ते 7 जानेवारी, सिडनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT