Boycott Chennai Super Kings trends on twitter after csk brought Maheesh Theekshana  esakal
IPL

Boycott Chennai Super Kings रैनामुळे नाही तर 'या' खेळाडूमुळे आहे ट्रेंडवर

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल 2022 मेगा लिलावात (IPL 2022 Auction) चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings सर्वात यशस्वी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) अनसोल्ड राहिला. सीएसकेने आपल्या इतर सर्व खेळाडूंना संघात परत घेण्यासाठी प्रयत्न केले. काहींना घेतले देखील मात्र आयपीएल (IPL) इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सुरेश रैनासाठी त्यांनी बोली लावली नाही. याचे पडसाद सोशल मीडियावर दोन दिवस उमटत होते. सुरेश रैनासाठी भावनिक झालेले चाहते सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त करत होते. आज देखील #Boycott_ChennaiSuperKings हा ट्रेंड ट्विटरवर जोरदार ट्रेंड करत आहे. मात्र या चेन्नई सुपर किंग्जवर बहिष्कार घालण्याची भाषा करणारा हा ट्रेंड सुरेश रैनासाठी नाही तर श्रीलंकन खेळाडू महीश तीकशाना याच्यामुळे सुरू आहे.

श्रीलंकेचा हा 21 वर्षाचा खेळाडू यापूर्वी श्रीलंकन आर्मीमध्ये होता. श्रीलंकन आर्मीबद्दल तामिळ नागरिकांमध्ये प्रचंड राग आहे. लंकन आर्मीवर लंकेतील तामिळ लोकांवर अत्याचार आणि त्यांचे मोठ्याप्रमाणावर हत्याकांड केल्याचा आरोप आहे. श्रीलंकन खेळाडू महीश तीकशाना याने फक्त श्रीलंकन आर्मीमध्ये सेवा बजावलेली नाही तर त्याने श्रीलंकन आर्मीचे गुणगान गाणारी वक्तव्ये देखील केली होती. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने अशा खेळाडूला आपल्या संघात घेतल्याने सोशल मीडियावर त्यांच्याविरूद्ध ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक लोक सीएसकेवर टीका करत आहेत.

तीकशानाने गेल्या वर्षी श्रीलंकन आर्मीत जवळपास 150 क्रिकेटर्स आहेत असे सांगत आर्मी त्यांना देत असलेल्या सोयी आणि सुविधांचे गुणगान गायले होते. तो पुढे म्हणाला होता की, 'यावरून क्रिकेट खेळाच्या वाढीसाठी श्रीलंकन आर्मी किती मदत करते हे दिसून येते.' तीकशाना फक्त इथेच थांबला नव्हता. त्याने युद्धाच्यावेळी अनेक गुन्हे केल्याचा आरोप असलेल्या श्रीलंकन आर्मीचे शावेंद्रा सिल्वा यांचे देखील आभार मानले होते. तीकशानाने त्याची कारकिर्द फुलण्यासाठी मदत केल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT