hardik pandya SRH vs MI ipl 2024 marathi news 
IPL

SRH vs MI : हार्दिक पांड्याची संथ खेळी पडली महागात... ठरला मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण

Sunrisers Hyderabad win by 31 runs vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्स बुधवारी सपशेल अपयशी ठरले. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण करताना आयपीएलमधील एका डावातील सर्वाधिक २७७ धावसंख्या उभारली.

Kiran Mahanavar

Sunrisers Hyderabad win by 31 runs vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्स बुधवारी सपशेल अपयशी ठरले. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण करताना आयपीएलमधील एका डावातील सर्वाधिक २७७ धावसंख्या उभारली.

धावांचा पाठलाग करताना मुंबईने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण त्यांना पाच बाद २४६ धावांपर्यंत मजल मारता आली. अखेर ३१ धावांनी पराभव झाला. दोन्ही डावांत मिळून विक्रमी ५२३ धावसंख्या उभारण्यात आली. या लढतीत सर्वाधिक ३८ षटकार मारले गेले. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. हैदराबादने पहिल्या विजयाला गवसणी घातली.

हैदराबादकडून मुंबईसमोर २७८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. रोहित शर्मा व इशान किशन या जोडीने ५६ धावांची भागीदारी करताना आश्‍वासक सुरुवात केली; पण दहा धावांच्या अंतरात दोघेही बाद झाल्यामुळे मुंबईचा पाय खोलात गेला. शाहबाद अहमद याने इशानला ३४ धावांवर, तर पॅट कमिन्सने रोहितला २६ धावांवर बाद केले.

त्यानंतर नमन धिर व तिलक वर्मा या जोडीने ८४ धावांची भागीदारी करताना मुंबईच्या विजयाची आशा कायम ठेवली. जयदेव उनाडकटने नमन याला ३० धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवत हैदराबादसाठी मोठी कामगिरी केली. त्यानंतर ३४ चेंडूंमध्ये ६४ धावा करणारा तिलक कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १८८.२३ च्या स्ट्राईक रेटने दोन चौकार आणि सहा षटकार मारले.

कर्णधाराची फ्लॉप कामगिरी

त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याला काही विशेष दाखवता आले नाही. त्याला २० चेंडूत केवळ २४ धावा करता आल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १२० होता. मुंबईचा जो पण खेळाडू मैदानात येते होता, त्याचा स्ट्राइक रेट चांगला होता. पण कर्णधार हार्दिक पांड्याची संथ खेळी महागात पडली. त्याच्या या खेळल्यामुळे मुंबईचा पराभव झाला का असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या सामन्यात टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड अनुक्रमे 42 आणि 15 धावा करून नाबाद राहिले. हैदराबादकडून कर्णधार कमिन्स आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी शाहबाज अहमदला यश मिळाले.

दरम्यान, याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मयांक अगरवाल व ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने चार षटकांमध्ये ४५ धावांची भागीदारी करताना आक्रमक सुरुवात केली. हार्दिक पंड्याने अगरवाल याला ११ धावांवर बाद करीत जोडी तोडली. त्यानंतर हेड व अभिषेक शर्मा या जोडीने ६८ धावांची भागीदारी करताना मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. हेड याने २४ चेंडूंमध्ये नऊ चौकार व तीन षटकारांच्या साथीने ६२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. गेराल्ड कोएत्झी याने त्याला बाद करीत मोठा अडसर दूर केला. हेड याने १८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.

अभिषेक शर्मा व एडन मार्करम या जोडीने हैदराबादच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. पियूष चावलाच्या गोलंदाजीवर अभिषेक ६३ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने तीन चौकार व सात षटकार मारले. हैदराबादसाठी त्याने विक्रमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. त्याने १६ चेंडूंमध्ये ५० धावा पूर्ण केल्या. मार्करम व हेनरिच क्लासेन या दक्षिण आफ्रिकन जोडीने अखेरच्या षटकांमध्ये दे दणादण फटकेबाजी करताना नाबाद ११६ धावांची भागीदारी रचली. मार्करम याने २८ चेंडूंमध्ये नाबाद ४२ धावांची, तर क्लासेन याने ३४ चेंडूंमध्ये नाबाद ८० धावांची खेळी केली. या खेळीत क्लासेन याने चार चौकार व सात षटकार मारले. हैदराबादने तीन बाद २७७ विक्रमी धावा फटकावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT